कानपूर, 11 मार्च : जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या गोळ्याला जन्मानंतर काही तासांत रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माता न तूं, वैरिणी, नवजात बालकाचा जन्म होताच आईच्या ओठांवर स्मित हास्य आलं पण पुढच्या काही मिनिटांत चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून देत फरार झाली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घडली आहे.
कानपूर इथे डफरिन रुग्णालयात शनिवारी गर्भवती महिला भर्ती झाली होती. रविवारी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाला पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. मात्र पुढच्या काही सेकंदात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
या महिलेनं मुलाला गुपचूप उचलत रुग्णालयातून पळ काढला. या घटनेमुळे रुग्णालयातील महिलाही हैराण झाल्या होत्या. या गायब झालेल्या महिला आणि बाळाचा रुग्णालयात शोध सुरू झाला. नवजात बाळ नवीन बाजारपेठेत रस्त्यावर असल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. सूचना मिळताच पोलीस आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथून या नवजात बाळाला डॉक्टरांनी ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. महिला मात्र अद्यापही फरार झाली आहे. या महिलेनं असं का केलं या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. पोलिसांकडून या फरार महिलेचा शोध सुरू आहे.
हे वाचा- जिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला तिच्यासह आईला X बॉयफ्रेंडनं केलं ठार
हे वाचा-भयंकर! मानवी हात आणि बोटं त्यानं कढईत शिजत ठेवली; बायकोनं पाहिलं आणि...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Kanpur, Uttar pradesh