विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 7 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. मुंबईत तब्बल 27 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी 5 पोलिसांची टीम कामाला लागली होती. आपला जीव धोक्यात घालून पोलिसांनी इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला काल अटक केली. या कारवाईनंतर आज मुंबईतील जोगेश्वरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मुंबईच्या पश्चिम दुधगती महामार्गावर रिक्षामधून प्रवास करणारा प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून तिघांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने तब्बल 22 लाख रुपये लुटले होते. या तीन जणांच्या टोळीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. चाकूचा धाक दाखवून आरोपींनी 22 लाख रुपये लुटले होते. चोरी गेलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा - शेवटी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं, 5 पोलीस स्टेशनची टीम घेत होते शोध
मुंबईत मागील काही दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मोगरा मेट्रो स्थानकाजवळ अशाच रुपल प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजर रिक्षामध्ये प्रवास करत होते. यावेळी ते 22 लाख रुपयांची बैग घेऊन प्रवास करत असताना त्यांना चाकूची धाक दाखवून त्यांची लुट झाली होती.
ही लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी मालवणी, विरार, ठाणे परिसरातून अटक केली आहे. नंदकुमार कांबळी (30 वर्षे),सनी शशिकांत सुर्वे (28 वर्ष) आणि अभिषेक जयस्वाल (30 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी गेलेल्या रकमेपैकी 19 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Mumbai News, Mumbai Poilce