जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / शेवटी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं, 5 पोलीस स्टेशनची टीम घेत होते शोध

शेवटी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं, 5 पोलीस स्टेशनची टीम घेत होते शोध

शेवटी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं, 5 पोलीस स्टेशनची टीम घेत होते शोध

ज्याठिकाणी इराणी वाडीत पोलिसांनी तब्बल 27 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. सिनेस्टाईल थरार यावेळी पाहायला मिळाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 6 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. मुंबईतही तब्बल 27 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी 5 पोलिसांची टीम कामाला लागली होती. आपला जीव धोक्यात घालून पोलिसांनी इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटक केली. या कारवाईत पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 मध्ये इराणी टोळीच्या आरोपींनी मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे असलेल्या MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. MHB पोलिसांनी शातिर इराणी टोळीचा पहिला आरोपी मोहम्मद संगा उर्फ झाकीर फरजत सय्यद (26) याला इराणी वाडी आंबिवली कल्याण येथून अटक केली. या इराणी टोळीतील आरोपींना पकडण्यासाठी बोरिवली, चारकोप, मालाड पोलीस ठाण्याचे डिटेक्शन ऑफिसर आणि टीम आणि एमएचबी पोलीस स्टेशनच्या टीमसह 26 जणांनी ही कारवाई केली. टीमने 2 रुग्णवाहिका आणि 2 खाजगी गाड्या घेऊन आरोपीला फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. हेही वाचा -  पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबेना, आणखी एका धक्कादायक प्रकाराने खळबळ 27 हून अधिक गुन्हे दाखल - आरोपीला अटक करताना पोलिसांनी सांगितले की, इराणी वाडीतील महिलांनी दगडफेक सुरू केली. दगडफेकीत काही पोलिसांनाही दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी जीव धोक्यात घालून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी मोहम्मद संगा उर्फ झाकीर फरजत सय्यद (26) याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात बनावट पोलीस असल्याचे दाखवून चेन स्नॅचिंग आणि फसवणुकीचे 27 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर -  आपला जीव धोक्यात घालून पोलिसांनी इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटक केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप बाळासाहेब साळवे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. मुंबईला राहणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप बाळासाहेब साळवे हे 2018 पासून ते पोलीस सेवेत रूजू झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात