झुंझुनू, 27 मार्च : राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झुंझुनूच्या नवलगडमधील केरू गावात एका बापाने आपल्या 15 महिन्यांच्या मुलीची भिंतीवर आपटून हत्या केली. आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पती-पत्नीमधील भांडणाची किंमत त्यांच्या निष्पाप मुलीला जीव देऊन चुकवावी लागली. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
नवलगढ ठाणेप्रभारी सुनील शर्मा यांनी सांगितले की, परसरामपुरा येथील कविताचे लग्न गिरधरपुरा येथील कैलाशसोबत झाले होते. कविता गणगौर पूजनासाठी तिचे आजोबांकडे कैरू येथे आली होती. रविवारी सकाळी कैलास कविताला घेऊन जाण्यासाठी कैरूला आला. पण कविताने जाण्यास नकार दिला. कविताने नकार दिल्याने पती नाराज झाला. तिच्या आजोबा आणि मामानेही कैलासला समजावून सांगितले. पण, त्याचा राग शांत झाला नाही.
पत्नीच्या मामाच्या हातातून मुलीला हिसकावलं
यावर कैलास संतापला. कविताच्या मामाच्या मांडीवर खेळणारी त्यांची 15 महिन्यांची मुलगी ओजस्वी हिला त्याने हिसकावून नेले. नातेवाइकांनी ओजस्वीला परत करण्याची विनंती केली. यावेळी कैलासला राग अनावर झाला होता. त्याने कुठलाही विचार न करता आपल्या निरागस मुलीला भिंतीवर फेकले. भिंतीला आदळल्याने ओजस्वी जमिनीवर पडली आणि ती गंभीर जखमी झाली.
वाचा - 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ, डॉक्टराचा लॅपटॉप दुरस्तीतला गेला आणि....
डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले
या घटनेने हादरलेल्या कुटुंबीयांनी ओजस्वीला गंभीर अवस्थेत घेऊन तात्काळ नवलगढ रुग्णालयात गाठलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. त्याचबरोबर मुलीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये मुलीच्या आईचे रडून-रडून हाल झाले आहे. एसएचओ सुनील शर्मा यांनी सांगितले की, कविता आणि तिच्या धाकट्या बहिणीचे लग्न कैलाश आणि त्याच्या लहान भावासोबत एकाच घरात झाले आहे.
पत्नी माहेरी गेल्याने आरोपीला राग
कैलासच्या लहान भावाला दारूचे व्यसन आहे. या कारणावरून लहान भाऊ आणि पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून भांडण सुरू होते. या भांडणामुळे कविता आणि कैलासमध्ये दुरावा सुरू होता. या विचित्रपणामुळे, रागाच्या भरात कैलासने त्याच्या 15 महिन्यांच्या मुलीला भिंतीवर आपटले. यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर ओजस्वीची आई आणि तिचे इतर कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.