Home /News /crime /

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra Nashik) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  नाशिक, 06 जुलै : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या (Maharashtra Nashik) येवला येथे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका 35 वर्षीय मुस्लिम समुदायाच्या धर्म गुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. (Muslim cleric shot dead) मात्र, हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (Nashik police) दरम्यान मागच्या कित्येक दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान हे गुरू अफगाणिस्तानमध्ये राहत होते. चार जणांनी ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. येवला येथील एमआयडीसी (Nashik yewala midc) परिसरात सायंकाळी ही घटना घडली.

  एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव ख्वाजा सय्यद चिश्ती असे आहे, जो येवल्यात 'सूफी बाबा' म्हणून ओळखला जात होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.

  हे ही वाचा : सत्ताबदलानंतर फडणवीसांनी पहिल्यांदाच घेतलं अमित शाहंचं नाव, हे आहे उपमुख्यमंत्री व्हायचं कारण!

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचे एक एसयुव्ही वाहन जप्त करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मगुरूंची हत्या करून वाहन तेथेच ठेवून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत.

  पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांची एक एसयूव्ही जप्त करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तसेच येवला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहोत.

  आरोपींनी सुफी बाबावर शेतात गोळ्या झाडल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून एक वाहन जप्त केले आहे. मात्र, गेल्या महिन्यात 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल ऑपरेटरचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनातही पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली होती.

  हे ही वाचा : काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, उद्धव ठाकरेंचे खोचक चिमटे

  भाजप नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी उदयपूरमध्ये एका टेलरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तसाच प्रकार अमरावतीमध्येदेखील घडला. उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची हत्या होण्यापूर्वी अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाली. मात्र ही घटना दरोडा असल्याचं भासवण्यात आलं. आता या प्रकरणाचा तपास एनआयएनं हाती घेतला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime, Crime news, Maharashtra News, Murder news, Nashik

  पुढील बातम्या