खुंटी(झारखंड) 06 डिसेंबर : झारखंडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यात एका 20 वर्षीय आदिवासी व्यक्तीने जमिनीच्या वादातून आपल्या 24 वर्षीय नातेवाईकाचा शिरच्छेद केला आहे. या घटनेत आणखी आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीच्या मित्रांनी शिरच्छेद केलेल्या डोक्यासोबत सेल्फी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नुकतीच मुर्हू परिसरात घडली. मृताचे वडील दसाई मुंडा यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे रविवारी मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुणाच्या वडिलांनी २ डिसेंबरला दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कानू मुंडा १ डिसेंबरला घऱात एकटा होता. शेतातील कामांसाठी कुटुंबीय घऱाबाहेर गेले होते. संध्याकाळी घऱी परतल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना पुतण्या सागर मुंडा आणि त्याच्या मित्रांनी कानूचं अपहरण केल्याची माहिती दिली. कानूचा शोध लागत नसल्याने वडिलांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
हे ही वाचा : वेबसीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलसोबत संतापजनक कृत्य; मुंबईतील धक्कादायक प्रकार
एफआयआरमध्ये 55 वर्षीय मुंडा यांनी म्हटले आहे की, त्यांचा मुलगा कानू मुंडा 1 डिसेंबर रोजी घरी एकटा होता. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य शेतात कामाला गेले होते. घरी परतल्यावर त्याचा पुतण्या सागर मुंडा व त्याच्या मित्रांनी मुलाचे अपहरण केल्याचे गावकऱ्यांमार्फत समजले. याबाबत पुतण्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.
मुर्हू पोलिस स्टेशनचे प्रभारी चुडामणी तुडू यांनी सांगितले की, या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी खुंटी उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तयार करण्यात आले होते. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस पथकाने कुमंग गोपला जंगलात काणेचे धड आणि दुलवा तुंगरी भागापासून 15 किमी अंतरावर शिर पोलिसांनी जप्त केले.
कानूचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं होतं. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांना जंगलात धड सापडलं. तसंच तेथून १५ किमी अंतरावर शीर फेकून देण्यात आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी शीरासह फोटो काढले होते.
हे ही वाचा : 45 वर्षीय महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके, मुंबई हादरली
पोलिसांनी पाच मोबाइल, दोन धारदार शस्त्रं, कुऱ्हाड आणि एक वाहन जप्त केलं आहे. पोलिसांच्या महितीनुसार, जमिनीच्या एका तुकड्यावरुन दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक काळापासून वाद सुरु होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Gang murder, Murder, Murder news