रांची, 17 डिसेंबर : झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये एका तरुणाची हत्या झाली. त्या हत्येनंतर संतप्त जमावाने अचानक काही घरे पेटवल्याने खळबळ माजली. ही घटना हिंदपिरी भागातील आहे. घटनास्थळी हिंदपिरी ठाणेदारासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. हिंदपिरी परिसरात दरसलाल अमजद उर्फ जावेद नावाच्या तरुणावर चाकूने वार करण्यात आला, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जावेदच्या मृत्यूची बातमी समजताच जावेदच्या मित्रपरिवारासह त्याच्या कुटुंबीयांना राग अनावर झाला. जावेदचा मृतदेह घरी पोहोचताच संतप्त जमावाने हिंदपिरी येथील गोल्डन, शहनाज खातून, लंगडा बबलू आणि मोहम्मद मुख्तार यांची घरे जाळली. मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांवर जावेदची हत्या केल्याचा आरोप आहे. यामुळे सतप्त जमावाने हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड
अमजद शुक्रवारी दिवसभरात काही कामासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, वाटेत एकाने त्याला गाठले आणि त्याच्याकडून मोबाईल व पैसे हिसकावून घेण्यास सुरुवात केली, त्याला अमजदने विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.
दरम्यान, आरोपीने मोटूने सोबत ठेवलेला चाकू काढून अमजदवर सपासप वार केले. यामध्ये अमजद गंभीर जखमी झाल्याने जागीच पडला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : पब्जी गेमचं व्यसन जीवावर; बीडमध्ये 15 वर्षीय मुलाचा भयानक निर्णय
परिसरात गोंधळ आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच हिंदपिरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर अग्निशमन दलाने आग लागलेल्या घरांवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. यावेळी डीएसपी प्रकाश सोय म्हणाले की, परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Jharkhand, Police action, Police arrest