'जेसीबी'ने झाला युवकाचा संशयास्पद मृत्यू, मात्र खून झाल्याचा लोकांना संशय

'जेसीबी'ने झाला युवकाचा संशयास्पद मृत्यू, मात्र खून झाल्याचा लोकांना संशय

युवकाचा जेसीबीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र ही अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

  • Share this:

 अमोल गावंडे, बुलडाणा 10 फेब्रुवारी : बुलडाणा जिल्ह्याचा खामगाव तालुक्यातील वाडी भागात झालेल्या एका खुनाच्या घनेने खळबळ उडालीय आहे. टेक्निकल शाळेसमोर मुलींच्या नवीन वसतीगृहाचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी ही घटना घडली. इथे बांधकामासाठी जेसीबीने काम सुरु होतं. तिथे एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालंय. युवकाचा जेसीबीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र ही अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

रविवारी रात्री वस्तीगृहाच्या गेटजवळ जेसीबी क्रमांक M.H. 28 A.Z 0428 ने खोदकाम सुरू होते. या दरम्यान त्या ठिकाणी असलेले मिलिंद गौतम गव्हांदे (वय 30) यांना जेसीबीची जबर धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ही रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. अशी माहिती जेसीबीचे चालक आणि मालक संतोषी विठ्ठल चव्हाण यांनी दिली.

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

ते वाडी इथं राहणारे आहेत. त्यांच्या निदर्शनास आले की मृतक मिलिंद गव्हांदे हे वाडी येथील विनोद बुद्ध प्रकाश चोटमल त्यांच्या घरी काही कामासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईकाची घटनास्थळी पोहोचले.

भावजीची निर्घृणपणे हत्या करत भावानेच पुसलं बहिणीच्या कपाळावरचं कुंकू

याप्रकरणी विनोद चोटमल यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संतोष चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम 279 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून या घटनेबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2020 03:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading