Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे

हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे

हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 फेब्रुवारी : हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडीतेचा आज सकाळी 6.55 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रात आक्रोश उमटला होता. हिंगणघाटमधील दारोडा गावातील जमाव संतप्त झाला होता. ते नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी करीत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचींही शर्थ केली पण काळाने घाला घातला. हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे. आरोपीला अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल व खटला जलदगतीने चालविण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला फासावर लटकवू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. अनेकदा या प्रकरणात न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरू असते. शिक्षा होण्यासही बराच वेळ लागतो. मात्र या प्रकरणात तसं घडू देणार नाही आणि लवकरात लवकर गुन्हा गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंगणघाट जळीत हत्याकांड

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकेश नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नराधमाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. आता काही वेळापूर्वीच पीडितेचे पार्थिक दारोडा गावात दाखल झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर होती. हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने पीडितेचा मृत्यू ओढवला. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने या पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकारने घेतला होता. पीडितेसाठी रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला होता व त्या ठिकाणी दोन डॉक्टर व 7 नर्सेसची 24 तास नेमणूक करण्यात आली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून  शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिची झुंज अखेर संपली.

First published:

Tags: Hinganghat, Maharashtra, Mumbai, उद्धव ठाकरे, शिवसेना