जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जालन्यामध्ये रिअल लाईफ 'ishqiya', सिलिंडरला केला बॉम्ब आणि नवऱ्याला उडवलं

जालन्यामध्ये रिअल लाईफ 'ishqiya', सिलिंडरला केला बॉम्ब आणि नवऱ्याला उडवलं

जालन्यामध्ये रिअल लाईफ 'ishqiya', सिलिंडरला केला बॉम्ब आणि नवऱ्याला उडवलं

वकील पतीला बयोकनंच संपवलं, एका चुकीमुळे असं उलगडलं हत्येचं रहस्य…पतीची हत्या करून सिलिंडर स्फोटाचा बनाव करणारी बायको अशी अडकली, नेमकं काय प्रकरण

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जालना : कधी कशासाठी मन फिरेल याचा नेम नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे बायकोनंच वकील पतीची हत्या करून अपघात झाल्याचा बनाव केला. मात्र एका चुकीनं सगळ्याचं बिंग फुटलं आणि रहस्य उलगडलं. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वकील पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याची हत्या करण्यात आली. नाक आणि तोंड दाबून पतीनं नवऱ्याला संपवलं. त्यानंतर गॅसचा स्फोट घडवून आणला आणि त्यामध्ये मृत्यू झाल्याचा बनाव केला. या प्रकरणी वकील संघटनेनं पोलिसांना चौकशी करण्याची मागणी केली. हेही वाचा- नागपूर : महिला बीडीओ अधिकाऱ्याने कंत्राटी कर्मचाऱ्यालाच मागितली लाच…; वाचा तरुणीने पुढे काय केलं? जालना इथे वकील किरण लोखंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्यांची बाईक राममूर्ती परिसरातील पुलाखाली आढळून आली. त्यानंतर वकील संघटनेनं या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी पोलिसांना कसून चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी वकिलाची पत्नी मनीषा यांना चौकशीसाठी बोलवलं. त्यावेळी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. यावेळी उत्तर देताना मनीषा गोंधळली. पोलिसांनी आणखी प्रश्न विचारले. गोंधळलेल्या मनीषाने अखेर आपणच खून करून नंतर सिलिंडर स्फोटाचा बनाव केल्याचं कबूल केलं. या हत्येमागचं अजून कारण समोर आलं नाही. हेहीवाचा- प्रसिद्ध गरबा गायिकेची हत्या, पैशांसाठी गर्भवती महिलेनं केला मैत्रिणीचा खून; धक्कादायक माहिती समोर या प्रकरणी मयताचा आतेभाऊ दीपक ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनीषा आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केलं. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात