मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण, जळगावमधील खासगी क्लासच्या शिक्षिकेचा धक्कादायक प्रताप

नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण, जळगावमधील खासगी क्लासच्या शिक्षिकेचा धक्कादायक प्रताप

जळगावमध्ये शिक्षिकेकडून नऊ वर्षाच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण

जळगावमध्ये शिक्षिकेकडून नऊ वर्षाच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण

जळगावमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी क्लासमधील शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालकाला कपडे काढून बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Chetan Patil

नितीन नांदुरकर, जळगाव, 2 सप्टेंबर : जळगावमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी क्लासमधील शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालकाला कपडे काढून बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. आपल्याला नेहमी मारहाण होत असल्याची तक्रार बालकाने पालकांकडे केली होती. मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी पालकांनी अचानक क्लासमध्ये प्रवेश केल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

शिक्षिकेने बालकाला कपडे काढून बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. मुलाच्या पालकांनी सदर प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत संबंधित प्रकार उघड केला. शिक्षकेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(मूल होण्यासाठी धडपडत होती; IVF उपचारादरम्यान ललिता कोमात, काही दिवसातच मृत्यू)

खरंतर लहान मुलांना अशाप्रकारच्या मारहाण करण्याचे याआधीदेखील असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. काही शिक्षकं खरंच असंवेदनशीलपणे लहान मुलांना मारहाण करतात. अर्थात अशा शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षकांचा धाक राहावा इतपत ठीक आहे. पण लहान मुलांचे कपडे काढून त्यांना मारहाण करणं ही विकृती आहे. त्यामुळे अशा विकृत शिक्षकांना योग्य शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुबियांनी केली आहे.

First published:

Tags: Crime, Jalgaon