मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मूल होण्यासाठी धडपडत होती; IVF उपचारादरम्यान ललिता कोमात, काही दिवसातच मृत्यू

मूल होण्यासाठी धडपडत होती; IVF उपचारादरम्यान ललिता कोमात, काही दिवसातच मृत्यू

आई होण्याच्या इच्छेने ललिताचा जीव गेला.

आई होण्याच्या इच्छेने ललिताचा जीव गेला.

आई होण्याच्या इच्छेने ललिताचा जीव गेला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

नोएडा, 2 सप्टेंबर : एक महिलेचा IVF च्या उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ग्रेटर नोएडामधील बिसरख भागात एका महिलेचा IVF उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे. आता पोलिसांच्या तपासात डॉक्टरची MBBS ची डिग्री बनावटी असल्याचंही समोर आलं आहे. यानंतर पोलिसांनी डॉक्टरविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललिता राव ही महिला वसुंधरा इंदिरापूरम येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. गेल्या 19 ऑगस्ट रोजी ती नोएडामधील इको विलेज-2 मार्टजवळील आयव्हीएफ क्रिएशन वर्ल्ड येथे उपचारासाठी गेली होती. गेल्या 2 महिन्यांपासून ती याच सेंटरमधून उपचार घेत होती.

लहान मुलांकडे थोडंस दुर्लक्ष अन्; खेळता खेळता 4 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू, पवार कुटुंब हादरलं!

19 ऑगस्ट रोजी ललिता रावत हिच्यावर डॉक्टर प्रियरंजक ठाकूर उपचार करीत होते. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ललिताची प्रकृती बिघडली. यानंतर ललिता कोमामध्ये गेली. त्यानंतर डॉक्टरांनी ललिताला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. या सर्व प्रकारानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्याच्या आधारावर पोलीस तपास करीत आहे.

डॉक्टरांची तुरुंगात रवानगी..

यथार्थ रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी, 26 ऑगस्ट रोजी ललिताचा मृत्यू झाला. यानंतर आयव्हीएफ सेंटरच्या एमडी प्रियरंजन ठाकूर यांना 28 ऑगस्ट रोजी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, डॉक्टर प्रियरंजन ठाकूर यांची डिग्री तपासण्यात आली. त्यांची डिग्री ही बनावटी असल्याचंही समोर आलं आहे.

First published: