मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दारूच्या नशेत पतीची हत्या..सासुसमोर कबुली; तरीही 4 दिवसांनी बंद दरवाज्यातून झाला खुलासा

दारूच्या नशेत पतीची हत्या..सासुसमोर कबुली; तरीही 4 दिवसांनी बंद दरवाज्यातून झाला खुलासा

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच याचं लग्न झालं होतं.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच याचं लग्न झालं होतं.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच याचं लग्न झालं होतं.

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 28 ऑगस्ट : डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीतून हत्येची घटना समोर आली आहे. या घटनेत एक पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी दारूच्या नशेन सासूच्या घरी गेली. येथे जाऊन तिने पतीची हत्या केल्याचं कबुलही केलं. मात्र सासूने सूनेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिला घरी जाण्यास सांगितलं. चार दिवसांनंतर मात्र घरात मुलाचा मृतदेह बघून सासुला धक्काच बसला.

पोलिसांनी घराचं दार तोडून पाहिलं तर तरुणाचा मृतदेह काळा पडला होता आणि किडे पडले होते. ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. दोघांंचं 6 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवरा-बायको वेगळं घर घेऊन राहत होते. मृत तरुणाच्या आईने सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले. पत्नी कांता 23 ऑगस्ट रोजी खोली बंद करीत असल्याचं दिसत आहे. यानंतर ही खोली पुन्हा उघडली गेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष खोईबाल याने सांगितलं की, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दारूच्या नशेन सुनेने दिली कबुली

मृत तरुणाची आई बेवा गलाब यादव (65) यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा नाथू यादवने 6 महिन्यापूर्वी कांतासोबत (विधवा विवाह) लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघे मुगेड गावात खोली भाड्याने घेऊन राहत होते. दोघेही मजुरी करून घर चालवत होते. मृत तरुणाच्या आईने सांगितलं की, 23 ऑगस्ट रोजी नाथूची पत्नी त्यांच्या घरी आली होती. तिने सांगितलं की, मी तुझ्या मुलाची हत्या केली आहे. आता मी तुमच्या घरात राहणार. मुंगेडमध्ये त्याच्या घरातवर टाळं लावलं होतं.

हे ही वाचा-आता हद्दच झाली! 64 वर्षीय नराधमाने पत्नीचा Private Part शिवला; देशभरात खळबळ

दुर्गंधी येऊ लागल्याने झाला खुलासा

ज्या खोलीत नाथू यादव तिच्या पत्नीसोबत राहत होता, त्या खोलीतून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागली. खोलीतून किडे निघत होते. जवळपासच्या लोकांनी खिडकीतून पाहिलं तर आत मृतदेह पडला होता. यानंतर लोकांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दार उघडून पाहिलं तर घरात नाथूचा मृतदेह पडला होता आणि त्याला किडे लागले होते. मृतदेह चार दिवसांपासून येथे पडून होता, त्यामुळे शरीर काळं पडलं होतं आणि दुर्गंधी येत होती. घटनेची माहिती मिळताच नाथूची आई घटनास्थळी दाखल झाली. मुलाचा मृतदेह पाहताच आईच्या पायाखालून जमिन सरकली.

आरोपी पत्नीचा तपास सुरू

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथूच्या आईने दिलेल्या माहितीनुसार पत्नी कांताने मुलाची हत्या केली आहे. ती फरार आहे. सध्या तिचा शोध सुरू आहे. अद्याप हत्येमागील कारण समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Crime news, Murder, Rajasthan, Wife and husband