जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Instagram वर मैत्री, मग लैंगिक अत्याचार आणि ब्लेडने शरीरावर लिहिलं नाव..अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार

Instagram वर मैत्री, मग लैंगिक अत्याचार आणि ब्लेडने शरीरावर लिहिलं नाव..अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार

फाईल फोटो

फाईल फोटो

डॉक्टर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलीची इंस्टाग्रामवर कानपूरमध्ये राहणाऱ्या विकास ठाकूर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. दरम्यान, विकासने तिचे फोटो काढून अश्लील व्हिडिओ बनवले

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 06 मार्च : एका तरुणाने प्रथम एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली, त्यानंतर तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर मुलीच्या अंगावर ब्लेडने स्वतःचं नाव लिहिलं. या तरुणाशिवाय या घटनेत आणखी सात जणांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलीची इंस्टाग्रामवर कानपूरमध्ये राहणाऱ्या विकास ठाकूर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. दरम्यान, विकासने तिचे फोटो काढून अश्लील व्हिडिओ बनवले. यातून तो ब्लॅकमेल करायचा. त्याच्या भीतीने मुलगी कोटा येथे गेली होती. आठवडाभरापूर्वी ती घरी आली. दरम्यान, तरुणाने फोन करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रेम जडलं अन् विषय संपला; चक्क सूनेला घेऊन पळून गेला सासरा, मग मुलाने केलं हे काम तू आली नाहीस तर व्हिडीओ व्हायरल करेन, असं तो म्हणाला. यावर ही मुलगी सांगितलेल्या कॅफेमध्ये पोहोचली. येथे मुलाने तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने मुलीला गाडीत बसवून सुनसान ठिकाणी नेलं. इथे त्याचे दोन मित्र अजय आणि अमन यांनीही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यादरम्यान आणखी ५ मुले आली. मारहाणीनंतर सर्वांनी बलात्काराचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीने आरडाओरडा केला असता आजूबाजूचे लोक आले. यानंतर आरोपी पळून गेले. लोकांनी मुलीकडून माहिती घेऊन तिच्या पालकांना माहिती दिली. पालकांनी तिला घरी नेलं आणि पोलिसांना कळवलं. चप्पलचं भांडण थेट रक्तरंजित वादात बदललं! जोडप्याचं शेजाऱ्यासोबत भयानक कांड, पत्नीला अटक, पती फरार… पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विकास ठाकूरसह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये विकासवर बलात्कार, त्याचे मित्र अमन आणि अजय यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न, तर अन्य 5 मित्रांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्रा पोलीस स्टेशनचे प्रभारी मानवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, मुलीने तिच्या बहिणीला सांगितलं की, आरोपी विकासने तिच्या शरीरावर ब्लेडने त्याचं नाव लिहिलं आहे. मुलीचे कुटुंबीय घाबरले आहेत, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत. एसीपी अभिषेक पांडे यांनी सांगितलं की, नातेवाईकांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात