Home /News /crime /

मुंबईहून परतताच गर्लफ्रेंडला गुपचूप भेटला; दुसऱ्या दिवशी तलावात तरंगत होता मृतदेह

मुंबईहून परतताच गर्लफ्रेंडला गुपचूप भेटला; दुसऱ्या दिवशी तलावात तरंगत होता मृतदेह

दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये होते. याचा अंत दुर्देवी झाला आहे.

    लखनऊ, 10 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बलिया जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असताना आरती हत्याकांडात धक्कादायक खुलासा झाला आहे. आरतीची हत्या (Killled Girlfriend) त्याच्या प्रियकरानेच केली होती. त्यानेच आरतीला पाण्यात बुडलून मारून टाकलं. काही दिवसांपूर्वी आरतीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. (Insistence on marriage girlfriend was killed by boyfriend drowning in water) पोलिसांवर होता प्रकरण दाबण्याचा आरोप.. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आरतीची बुडवून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. यात पोलिसांवर राजकीय दबाव होत होता. पोलिसांवर प्रकरण दाबण्याचा आरोपह केला जात होता. पीडितेच्या घरी गेल्या काही दिवसांपासूव अनेक नेते मंडळीही उपस्थिती लावत होते. शेवटी नातेवाईकांच्या मदतीने आरोपीचं नाव समोर आलं. आरोपी अंचल मुंबईत कामाला होता, मात्र तो वारंवार आरतीच्या गावी त्याच्या एका नातेवाईकांकडे येत जात होता. त्यातूनच आरतीची ओळख झाली. त्याने आरतीला एक सिम कार्डही दिलं होतं. त्यातून ते दोघेही बोलत असे. एकदा आरतीला फोनवर बोलताना तिचा भाऊ आणि बहिणीने पकडलं होतं. त्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली होती. हे ही वाचा-11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का 2 जानेवारी रोजी अंचल मुंबईवरुन उत्तर प्रदेशातील घरी आला होता. आरतीलाही हे कळालं होतं. 3 जानेवारी रोजी आरती भेटण्यासाठी जबरदस्ती करू लागली. भेटलो नाही तर आत्महत्या करीन असं ती वारंवार म्हणत होती. रात्री साधारण 10.30 वाजता आरतीने त्याला अवाया पाव्हर हाऊसच्या मागील बागेत बोलावल्याचं आरोपीने सांगितलं.  यावेळी आरती लग्नासाठी जबरदस्ती करू लागली. त्याने तिला कुटुंबाच्या परवानगीने लग्न करण्यास सांगितलं. मात्र ती ऐकत नव्हती. यादरम्यान दोघांंमध्ये हातापायी झाली व ते दोघीही तलावात पडले. पाण्यात पडल्यामुळे आरतीच्या नाका-तोंडात पाणी गेलं. काही वेळानंतर तिचा श्वास बंद पडला. आरतीने आणलेला टिफिन आणि चप्पल तलावाच्या थोडं पुढे फेकून देण्यात आलं. आणि मोबाइल घेऊन तो निघून गेला. पळताना सिम तोडून फेकून दिलं. मुंबईला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडलं आणि तुरुंगात पाठवलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Crime news, Girlfriend, Uttar pradesh news

    पुढील बातम्या