जयपूर, 7 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) झुंझुनूंमध्ये शुक्रवारी सायंकाळी 10 वीच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांच्या भीतीने आत्महत्या (Student Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून क्लास बंक करीत होता आणि याबाबत घरातील सदस्यांना कळालं होतं. भूपेंद्र (17) या विद्यार्थ्याचा मृतदेह एका खासगी शाळेच्या परिसरात दिसला. सूचना मिळताच डेप्युटी शंकरलाल छाबा घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवगृहात ठेवला. भूपेंद्र हा टागोर पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. पोलिसांना कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र बऱ्याच दिवसांपासून शाळेत जात नव्हता. याबाबत पालकांना कळालं तेव्हा त्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलण्याचं ठरवलं. (10th class student commits suicide due to fear of parents) यानंतर भूपेंद्र पुरता घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. भूपेंद्रचा मोठा भाऊ रिक्षा चालवित होता. त्या दिवशी गावावरुन भूपेंद्र रिक्षातून भावासोबतच आला होता. मध्य रस्त्यात मित्राकडे जायचं सांगून तो रिक्षातून खाली उतरला. सकाळी शाळेत जाणार असल्याचंही त्याने आपल्या भावाला सांगितलं. यानंतर सायंकाळी भूपेंद्रने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. हे ही वाचा- वृद्ध शेतकऱ्याने व्यासपीठावर BJP आमदाराच्या लगावली कानशिलात; Video Viral शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली सूचना.. शाळेच्या विद्यार्थ्यांी सर्वात आधीत भूपेंद्रला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. विद्यार्थी कॅन्टीनच्या दिशेने जात होते. येथून डोंगरापर्यंतच दृश्य दिसतं. येथे एका झाडावर भूपेंद्र लटकलेल्या अवस्थेत दिसला. विद्यार्थ्यांनी तातडीने शाळेच्या व्यवस्थापनेला याबाबत माहिती दिली. यानंतर शाळा व्यवस्थापकांनी पोलिसांना सूचना दिली. शेवटी पोलिसांनी भूपेंद्रच्या कुटुंबीयांना त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.