मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मर्डर-2 चित्रपटातून घेतली आयडिया; कपलने तांत्रिकाच्या म्हणण्यावरुन कॉलगर्लचा दिला बळी

मर्डर-2 चित्रपटातून घेतली आयडिया; कपलने तांत्रिकाच्या म्हणण्यावरुन कॉलगर्लचा दिला बळी

रात्रीच्या वेळी दोघे बाईकवरुन महिलेचा मृतदेह मांत्रिकाकडे घेऊन जात होते, तेवढ्यात...

रात्रीच्या वेळी दोघे बाईकवरुन महिलेचा मृतदेह मांत्रिकाकडे घेऊन जात होते, तेवढ्यात...

रात्रीच्या वेळी दोघे बाईकवरुन महिलेचा मृतदेह मांत्रिकाकडे घेऊन जात होते, तेवढ्यात...

  • Published by:  Meenal Gangurde

ग्वाल्हेर, 24 ऑक्टोबर : लग्नाच्या 18 वर्षांनंतरही मुल न झाल्यामुळे एका दाम्पत्याने आपली बहीण आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून एका मांत्रिकाच्या इशाऱ्याने कॉलगर्लची हत्या केली. कॉलगर्लचे कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजने मर्डर मिस्ट्री (Murder Mystery) सोडवली. कॉलगर्लच्या (Call Girl Murder) हत्या केल्यानंतर दाम्पत्याची बहीण आणि तिचा प्रियकर मृतदेह मांत्रिकाकडे घेऊन जात होते, मात्र मृतदेह बाईकवरुन पडला. यानंतर दोघेही मृतदेह सोडून पळून गेले. पोलिसांनी दांम्पत्य, त्याची बहीण आणि बहिणीचा प्रियकर यांच्याशिवाय मांत्रिकालाही अटक केली आहे.

ग्लाल्हेरमध्ये गुरुवारी मिळालेला महिलेचा मृतदेह कथित कॉलगर्लचा होता. तिचा बळी चढविण्यात आला होता. लग्नाच्या 18 वर्षांनतर मुलं न झाल्याने दाम्पत्याने बहिण आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून एका मांत्रिकाच्या इशाऱ्याने कॉलगर्लची हत्या केली होती. हत्येची आयडिया मर्डर-2 चित्रपट पाहून मिळाली होती. (Ideas taken from the movie Murder 2 couple murdered Call girl)

आरोपींनी विचार केला की, कॉलगर्लला बोलावून तिचा बळी देऊ, चौकशीही होणार नाही. पोलीस काही दिवस तपास करतील आणि मग विसरून जातील. मात्र कॉलगर्लचे कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजने मर्डर मिस्ट्री सोडवली.

कॉलगर्लचा मृतदेह सापडला..

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी IITM कॉलेजजवळ रस्त्याच्या किनाऱ्यावर महिलेचा मृतदेह होता. तिच्या गळ्याभोवती खुणा होता. कोणीतरी गळा दाबून तिची हत्या केल्याचं यावरुन दिसून येत होतं. महिलेचं नाव आरती उर्फ लक्ष्मी मिश्रा असल्याचं समोर आलं होतं. 12 वर्षांपूर्वी पतीने तिला घटस्फोट दिला होता. तिची वागणूक चांगली नसल्याचं कारण देत पतीने तिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर महिला एका ऑटो ड्रायव्हरसोबत लिव्ह इनमध्येदेखील राहत असल्याचं सांगितलं जात होतं. महिलेचे कॉल डिटेल्स पाहिल्यानंतर ती एक कॉलगर्ल असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी तपासाचा अँगल बदलला. अवघ्या 24 तासात या घटनेचा खुलासा

मांत्रिक गिरवर यादवने दाम्पत्याला बळी देण्यासाठी सांगितलं होतं. ममका भदौरिया आणि बेटू भदौरिया यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली आगेत. त्यांना मुलं झालं नाही. मुलं व्हाव यासाठी दाम्पत्याची काहीही करण्याची तयारी होती. त्यांनी अनेक डॉक्टर केले, मात्र त्यांच्या घरात पाळणा काही हलला नाही. शेवटी बेटूने बहिणी मीरा राजावत सोबत चर्चा केली. तिने आपल्या प्रियकराला याबद्दल सांगितलं. यानंतर त्यांनी मांत्रिकाची भेट घेतली. मांत्रिकाने सांगितलं की एका जीवाच्या बदल्यात एक जीव लागले. म्हणजे घरात मुल हवं असेल तर बळी द्यावा लागेल.

हे ही वाचा-नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता देह व्यापार; तरुणींनी सांगितला भयावह अनुभव

मर्डर-2 चित्रपटातून घेतली हत्येची आयडिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री जॅकलीनचा चित्रपट मर्डर -2 यातून हत्येची कल्पना घेण्यात आली. या चित्रपटात एक सीरियल किलर घरी बोलावून एका कॉलगर्लची हत्या करतो. कॉलगर्लचे कोणी नातेवाईक नसतात त्यामुळे पोलीस प्रकरण सोडवू शकत नाही. यानुसार नीरजने प्लान केला. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. कोणाकडून नंबर घेऊन त्याने आरतीला बुधवारी रात्री भेटायला बोलावलं. तिला 10 हजार रुपये देण्याचं ठरवलं.

यानंतर बेटू आणि नीरजने मिळून तिची हत्या केली. यानंतर त्यांना हजीरामध्ये राहणाऱ्या मांत्रिकाला बळीचे फोटो दाखवायचे होते. त्यांनी मोबाइलवर महिलेचे फोटो काढले. मात्र त्यानंतर पकडले जाऊ या भीतीने डिलीट केले. मृतदेह बाईकवर ठेवून घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. रात्री 11 वाजता नीरज आणि मीरा बाईकवर आरतीचा मृतदेह मध्य ठेवून हजीरा तांत्रिकाच्या घरी जाण्यासाठी निघाले. रस्त्यात IITM कॉलेजवळ अचानक बाईकचं नियंत्रण बिघडलं आणि आरतीचा मृतदेह रस्त्यावरच पडला. यानंतर दोघेही घाबरले. तेथून काही लोक जात होते. ते पाहून बाईकवर बसून ते पळून गेले.

First published:

Tags: Crime news, Murder, Murder Mystery