नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 6 मे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा चाकूने भोसकून खून
(Murder) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पतीला जिल्हा न्यायालयाने
(District Court) आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. लदळ्या आसाराम पावरा, असे आरोपीचे नाव आहे. पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार करून खून करून पसार झाला होता. याप्रकरणी शेंदुर्णी दुरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
लदळ्या आसाराम पावरा यांचा विवाह जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे राहणाऱ्या फुनाबाई दगडू बारेला हिच्याशी झाला होता. लदळ्या हा पत्नी फुनबाई हिच्यावर चरित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करत होता. मार्च 2018मध्ये होळीच्या निमित्ताने फुनाबाई ही मालखेडा येथे आई जिलाबाई आणि वडील दगडू बारेला यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर 8 मार्च 2018 रोजी लदळ्या हा पत्नीला घेण्यासाठी मालखेडा येथे आला होता. रात्री जेवण करून सर्व कुटुंबीय झोपलेले असताना लदळ्या याने हातात चाकू घेऊन पत्नी फुनाबाई हिच्यावर सपासप वार करून खून करून पसार झाला होता.
हेही वाचा - विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप, नोकरी गेली...7 वर्षं तुरुंगात..अखेर प्रकरण निघालं खोटं, कोर्टाचे सुटकेचे आदेश
याप्रकरणी शेंदुर्णी दुरक्षेत्र अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून लदळ्या याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संशयित आरोपीवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात 12 साक्षीदार तपासण्यात आले.
यात मृत फुनाबाईचे आई, वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या आरोपी लदळ्या याला दोषी ठरवत कलम 302 अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 3 महिन्यांची सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.