नवी दिल्ली, 11 एप्रिल: देशाची राजधानी दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व्यक्तीनं अवैध संबंधाच्या संशयातून भररस्त्यात आपल्या पत्नीला आडवून चाकून सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेक लोकं होती, पण आरोपीचा राग पाहाता मृत महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. दरम्यान आरोपीने पतिने आपल्या पत्नीची 45 पेक्षा अधिक वेळा वार करून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. संबंधित 40 वर्षीय आरोपी पतिचं नाव हरिश मेहता असून मृत महिलेचं नाव नीलू आहे. 26 वर्षीय मृत नीलूचं आठ महिन्यापूर्वी आरोपी हरिशसोबत लग्न झालं होतं. आरोपी व्यक्ती हा मुळचा गुजरातमधील अलकापूरी येथील रहिवासी असून तो दिल्लीत एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करतो. तर नीलू एका दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयात काम करत होती. पत्नी नीलूने रुग्णालयात काम करणं पती हरिशला आवडत नव्हतं, त्यामुळे आरोपीने तिला काम करण्यास मनाई केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पण मृत नीलूने आपल्या पतीचा विरोध झुगारून रुग्णालयात काम करणं सुरूचं ठेवलं. यामुळे लग्नाच्या काही दिवसांतचं त्यांच्यात खटके उडू लागले. आपल्या पत्नीचे बाहेर अवैध संबंध असल्याचा संशय आरोपीला पतीला आला. दरम्यान त्यांच्यात अनेकदा वादही झाला. त्यामुळे मृत तरूणीने पतीला सोडून आपल्या आईवडिलांसोबत दिल्लीतील बुद्ध विहार याठिकाणी राहू लागली होती. त्यामुळे आरोपी हरिशने तिच्या हत्येचा कट रचला. दरम्यान काल (10 एप्रिल) दुपारी 2 च्या सुमारास नीलू कामावरून घरी येत असताना आरोपीने तिचा रस्ता अडवला आणि वाद घालायला सुरुवात केली. हे वाचा- एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह हत्येची योजना आखून आलेल्या आरोपीनं सोबत आणलेल्या चाकून भररस्त्यात तिच्यावर हल्ला केला. यावेळी पीडित महिला जीवाच्या अकांताने स्वतः चा बचाव करत होती. मात्र आरोपीनं तिच्यावर निर्दयीपणे अनेक वार केले. यावेळी रस्त्यावर अनेक लोकं बघ्याच्या भूमिकेत होते. यावेळी आरोपी पतिचा रुद्रावतार पाहाता महिलेच्या मदतीसाठी कोणीही सरसावलं नाही. या हल्ल्याती पीडित तरुणी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीचा पाठलाग करून अटक केली आहे.