मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पत्नीचा खून केला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली बेपत्ता असल्याची तक्रार, अखेर...

पत्नीचा खून केला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली बेपत्ता असल्याची तक्रार, अखेर...

वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे युवराजला ताब्यात घेतले

वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे युवराजला ताब्यात घेतले

वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे युवराजला ताब्यात घेतले

नागपूर, 25 फेब्रुवारी : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये खून आणि हत्याचे सत्र सुरूच आहे. वाठोडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (युवराज नेमचंद्र पटले वय 28) याने पत्नी (हंसा युवराज पटले वय 28) हिचा गळा आवळून खून केला आणि वाठोडा भागातील झुडपात मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर स्वतः वाठोडा पोलीस स्टेशन गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली.

मंगळवारी सायंकाळी हंसा यांचा मृतदेह झुडपात आढळून आला. वाठोडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयाच्या आधारे युवराजला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पत्नीचे कंत्राटदारासोबत अनैतिक संबंधाचा संशय युवराजला होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद आणि भांडणे होत होती.

युवराजसोबत भांडणालाा कंटाळून त्याची पत्नी हंसा त्याला सोडून वाठोडा भागात भाड्याने राहायला आली. 21 फेब्रुवारीला सायंकाळी युवराज हा हंसाला भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी वाठोड्यातील चांदमारी भागातील झुडपात नेले आणि तेथे तिचा खून केला, असे युवराजने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Maharashtra, Mumbai, Murder, Wife and husband