मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास, दौंडमधील घटना

प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास, दौंडमधील घटना

अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.

  • Published by:  sachin Salve

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 28 एप्रिल: प्रेमात अडथळा येत असल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात (Dound) उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये  7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेहाचा उलगडा अवघ्या काही तासात यवत पोलिसांनी केला आहे. मंगळवारी लीना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे या मायलेकरांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता.

पोलिसांनी रात्रभर रोखून धरली ऑक्सिजन गाडी;प्राणवायू न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू

घरातील 10 वर्षांच्या वैष्णवीने आपल्या सात वर्षाच्या भावाला आणि आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले होते.  त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मुलीचा जबाब घेऊन पोलिसांनी पती सचिन सोनवणेची प्राथमिक चौकशी केली.

अक्षय कुमारनं केली मोठी मदत; कोरोना रुग्णांना पुरवले Oxygen Concentrator

यवत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. पती सचिन सोनवणे याने प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे कबुल केले. अवघ्या एका दिवसात या खुनाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. सचिन सोनवणे या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: