जींद, 28 एप्रिल: सध्या भारतात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा (
Lack of oxygen) निर्माण झाला आहे. ऑक्सिजन न मिळाल्यानं देशात दररोज शेकडो रुग्णांचे मृत्यू (
Corona patient Death) होतं आहेत. अशा स्थितीत पोलिसांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी रात्रभर रोखून ठेवल्यानं एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे सकाळी कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी गाडीला जाऊ दिलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आली असून त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
संबंधित घटना हरियातील जींद जिल्ह्यातील आहे. येथील एक इनोव्हा चालक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पंजाबच्या धुरीहून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात होता. त्याला रुग्णाचा ऑक्सिजन संपण्यापूर्वी हरियाणा आणि दिल्ली ओलांडून रात्री तीन वाजेपर्यंत गाझियाबाद याठिकाणी जायचं होतं. पण रात्री 11 च्या सुमारास जींद पोलिसांनी त्याला मध्येच रोखलं. गाडीची तपासणी केल्यानंतर त्याला सकाळी सोडून दिलं, पण तोपर्यंत संबंधित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता.
हे वाचा-आईच्या मृतदेहाशेजारी 2 दिवस उपाशी पडून होतं बाळ, वर्दीतील आईपणाला फुटला पाझर
इनोव्हा गाडीच्या चालकानं सांगितले की, तो गाझियाबाद येथील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आपल्या मालकाच्या नातेवाईकासाठी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात होता. दरम्यान मध्येच जींद पोलिसांनी अडवल्यानं त्याला निर्धारित वेळेत पोहचता आलं नाही. मला रात्री तीन वाजेपर्यंत गाझियाबादला पोहोचणं गरजेचं होतं, परंतु पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही. त्यामुळे ऑक्सिजनअभावी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जींद पोलीस एसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत, ते म्हणाले की, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.
हे वाचा-नर्सने ऑक्सिजन काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईकांकडून तोडफोड
पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले
दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या इन्जार्जने पोलिसांवरील होणारे सर्व फेटाळून लावले असून आरोपात काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, रात्री पंजाबची पासिंग असलेल्या एका गाडीला थांबवण्यात आलं. या गाडीत दोन ऑक्सिजन सिलेंडर सापडले होते. त्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर आवश्यक कागदपत्रं दाखवली नाहीत. पण नंतर त्याने कागदपत्रं दाखवल्यानं रात्रीच्या वेळीच त्याला सोडण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.