रांची 30 मे : अनेकदा अतिशय क्षुल्लक कारणावरुन लोक आपल्या अगदी जवळच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्याच जीवावर उठतात. हत्येच्या अनेक घटना अशा असतात, ज्यात खूनाचं कारण ऐकून कोणीही थक्क होईल. सध्या अशीच एक घटना झारखंडमधून समोर आली आहे. चतरा येथील पोलीस स्टेशन हद्दीतील लरकुआ गावात वरातीत नाचल्याने एका व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसह मिळून पत्नीला मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की यात पत्नीचा मृत्यू झाला (Husband Killed Wife). कोणती मुलगी आपल्या वडिलांसोबत असं करू शकते? वाचून विश्वास बसणार नाही! हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पती शीतल भारतीला अटक केल्याचं रविवारी पोलीस सूत्रांनी सांगितलं. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर पोलीस स्टेशन हद्दीतील लारकुवा गावातील ही घटना असल्याचं त्यांनी सांगितलं. उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितलं की, सदर पोलीस स्टेशन हद्दीतील लरकुवा गावातील रहिवासी शीतल भारती आपल्या पत्नीसह शुक्रवारी वशिष्ठनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घनघरी गावात आपल्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेला होता. पतीला न सांगताच पत्नीचं दुसरं लग्न; नवऱ्याचं पोलिसात धाव घेत उपोषण पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास लग्नाच्या निमित्ताने शीतलची पत्नी शांती (वय २४) हिनेही वरातीसोबत नाचण्यास सुरुवात केल. ही गोष्ट पती शीतलला आवडली नाही. शीतलने रागात आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पत्नी शांती हिला इतकी मारहाण केली की यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत शांतीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी लव कुमार यांनी त्वरित कारवाई करत आरोपी शीतलला अटक केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. शवविच्छेदनानंतर शांतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.