Home /News /crime /

पतीला न सांगताच पत्नीचं दुसरं लग्न; नवऱ्याचं पोलिसात धाव घेत उपोषण

पतीला न सांगताच पत्नीचं दुसरं लग्न; नवऱ्याचं पोलिसात धाव घेत उपोषण

फोटो क्रेडिट - सोशल मीडिया

फोटो क्रेडिट - सोशल मीडिया

गणेश यांचे लग्न झाडेगाव येथील एक तरुणीशी 2011 मध्ये झाले होते. काही वर्ष संसार सुरळीत चालल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले.

    बुलडाणा, 29 मे :  पती आणि पत्नीमधील भाडणं (Husband Wife Dispute) होत असतात. कधी पत्नी माहेरी निघून जाते. किंवा अनेक दिवस पती-पत्नी दोघांमध्ये बोलणं बंद राहतं. कधी कधी पती पत्नीचे भांडण हे पोलिसांपर्यंतही गेल्याचे तुम्ही वाचले असेल. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं -  बुलडाणा जिल्ह्यातील एका पतीने थेट पत्नीविरोधातच उपोषण (Husband on Hunger Strike) सुरू केले आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा (Nandura) शहरातील आहे. एका पत्नीने घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले. याप्रकरणी या महिलेबाबत तक्रार करायला गेलेल्या तिच्या पतीला पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्याने थेट उपोषण केले. अन् पतीला बसला धक्का - गणेश मुरलीधर वडोदे असे उपोषण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश यांचे लग्न झाडेगाव येथील एक तरुणीशी  2011 मध्ये  झाले होते. काही वर्ष संसार सुरळीत चालल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. यानंतर डिसेंबर 2020 मध्ये गणेश यांची पत्नी माहेरी रक्षाबंधनाला गेली. मात्र, पतीसोबत भांडण होत असल्याने नाराज झालेली पत्नी परत आली नाही. यानंतर पतीने पत्नीला वारंवार फोन केले. मात्र, तरी त्यांच्या पत्नीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वैतागलेल्या पतीने थेट सासुरवाडी गाठली. मात्र, त्याठिकाणी त्याला पत्नी दिसून आली नाही. पतीने चौकशी केल्यावर सासुरवाडीतील लोकांनी सांगितले की, ‘तुझ्या पत्नीने दुसरे लग्न केले व ती नांदायला गेली आहे.’ हे ऐकल्यावर गणेश यांच्या पायाखालची जमीनच घरसली आणि त्यांना जबर धक्काच बसला. हेही वाचा - प्रेमविवाह केल्यानंतर एकमेकांच्याच चारित्र्यावर संशय, कंटाळून पत्नीची केली हत्या 26मेपासून उपोषण -  या घटनेनंतर गणेश यांनी या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट उपोषण करण्याचा मार्ग निवडला. गेल्या 26 मेपासून त्यांनी आपल्या पत्नीविरोधात उपोषण केले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर पत्नीवर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पतीने अशाप्रकारे उपोषण केल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Buldhana news, Marriage, Wedding, Wife and husband

    पुढील बातम्या