पाटणा, 08 मार्च : राजधानी पाटण्यात (Patna) हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. खुनाचा (Murder) असा प्रकार समोर आला की पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा चौथा नवरा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना हत्येमागील कारण सांगितलं आहे. आरोपी पतीनं कात्रीनं पत्नीची हत्या केल्यांचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या घटनेमुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
महिलेने केले होते अनेक विवाह
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या अवैध संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती जुनैदची रोज पत्नी अजमती खातून उर्फ पिंकी हिला मारहाण करायचा. पती-पत्नीमधील वाद इतका वाढला की पत्नीने पतीवर कात्री फेकून हल्ला केला. या हल्ल्यानंतर पतीनेही तिच्या हातातून कात्री काढून वार करून तिला ठार केलं. हत्येची ही घटना घडल्यानंतर पतीने पोलीस ठाणं गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. पत्नीच्या हत्येची कबुलीही दिली.
हे वाचा - येस बँक घोटाळा : पैसे काढण्यासाठी देवालाही उभं केलं रांगेत; अभिनेता चिंतेत
पोलिसांचा तपास सुरू
पतीच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनास्थळावरून मृतक अजमती खातून हिचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेजारील लोकांच्या म्हणण्यानुसार, या महिलेनं अनेक विवाह केले होते आणि संजय नावाच्या व्यक्तीशी लग्नानंतर गेली 5 वर्षे ब्रह्मपूर येथं राहत होती. एका पतीने तिला वारंवार मारहाण केली म्हणून तिने जुनैदशी चौथे लग्न केले होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेच्या आधीच्या तीन पतींचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे. खरंतर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.