मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ऑफिसमधील तरुणीवर आला जीव; पत्नीला सुगावा लागल्याने तिच्यासोबत..

ऑफिसमधील तरुणीवर आला जीव; पत्नीला सुगावा लागल्याने तिच्यासोबत..

याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

हापूड, 1 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यात एकीकडे नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन वर्षाच्या आधी प्रेयसीच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांनी अवघ्या 12 तासांत घटनेचा खुलासा केल्यावर आरोपी पतीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या हापूड येथे घडली. प्रेयसीसोबत आरोपी पती विकास शर्माने त्याची पत्नी सोनियाला त्या दोघांच्या रस्त्यातून हटवण्याचा प्लान तयार केला. यानंतर गाझियाबादहून पत्नीला सोबत घेऊन हापूडला पोहोचण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध आल्यावर दोरीने गळा आवळून त्याने आपल्या पत्नीचा खून केला. विवाहसंबंध असल्याने त्याने आपल्या पत्नीला रस्त्यातून हटवण्यासाठी तिचा खून केला. इतकेच नव्हे तर हापूड येथे आल्यावर त्याने दरोड्या दरम्यान, विरोध केल्याने पत्नीचा खून झाल्याची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली.

तो पोलिसांना म्हणाला की, जेव्हा तो निजामपूरजवळ पोहोचला तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्याची कार थांबवली आणि लुटमार सुरू केली. दरम्यान, पत्नीने विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांची हत्या केली. मात्र, पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर या घटनेचा सूत्रधार पतीच असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याने आपल्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.

हापूडचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितले की, आरोपीचे औषध कंपनीत काम करणाऱ्या विकास शर्माचे त्याच ठिकाणी नोकरीला असणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याबाबत विकासच्या पत्नीला माहित झाले होते. त्यामुळे यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आणि वाद वाढतच जात होता. त्यामुळे आरोपी पती विकासने आपल्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीला रस्त्यातून हटवण्याचा कट रचून हापूड येथे तिची हत्या केली. आणि दरोडेखोरांनी तिची हत्या केल्याची खोटी कहाणी रचली.

हेही वाचा - रात्रीच्यावेळी मदत करायचं सोडून IIT तरुणीसोबत पोलिसाने अश्लील..; मुंबईतील प्रकाराने खळबळ

दरम्यान, याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अटक केलेला आरोपी विकास शर्माने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवली. गळा दाबून खून कसा केला जातो, पिस्तूल कुठे सापडले, याबाबत त्याने गुगलवर सर्च केले, अशी माहितीही पोलिसांनी दिली. तसेच आरोपी पतीच्या ताब्यातून काही ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. आरोपी पतीने नवीन वर्षात ज्या प्रेयसीसोबत राहण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याआधीच पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपी पती विकास शर्माला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

First published:

Tags: Crime news, Murder news, Up crime news, Wife