Home /News /crime /

Amaravati : किरकोळ भांडणातून आधी पत्नीच्या गळ्यावर मारली लाथ, नंतर गाठला क्रूरतेचा कळस

Amaravati : किरकोळ भांडणातून आधी पत्नीच्या गळ्यावर मारली लाथ, नंतर गाठला क्रूरतेचा कळस

क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. याच वादाचे रुपांतर एका धक्कादायक घटनेत झाले.

    अमरावती, 5 जून : पती-पत्नीच्या भांडणात (Husband Wife Dispute) अनेकदा चुकीच्या घटना घडल्या आहेत. कधी पतीचा खून (Husband Murder) तर कधी पत्नीचा खून (Wife Murder) झाल्याचे तुम्ही वाचले असेल. यातच आता अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील पती-पत्नीच्या भांडणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीनं टोकाचे पाऊल उचललं आहे. काय आहे घटना? क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. याच वादाचे रुपांतर एका धक्कादायक घटनेत झाले. क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीच्या गळ्यावर लाथ मारली. तसेत बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केला. (Husband Killed Wife) मंजूषा चुन्नू उनके (वय - 24, रा. टोंगलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पुन्नू शंकरराव उईके (वय - 26), असे आरोपी पतीचे नाव आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टोंगलापूर येथे घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. मृत महिलेला आठ महिन्यांचा मुलगा आहे, अशी माहितीही समोर आली आहे. उईके कुटुंबीय मध्यप्रदेशातील आहे. मात्र, पुन्नूचे आईवडील शिरजगा बंड येथे राहतात. त्यामुळे पुन्नुसुद्धा शिरजगावात राहत होता. पुन्नू हा गवंडीकाम करतो. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह मंजूषासोबत झाला होता. यानंतर पुन्नू आणि मंजूषा दोन्हीजण शिरजगाव बंड येथेच राहत होते. 15 दिवसांपूर्वीच पुन्नू, त्याची पत्नी मंजूषा हे दोन्ही त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलासह टोंगलापूरला राहायला गेले होते. मात्र, याठिकाणी पुन्नू आणि मंजूषा या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते.  दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं प्रेयसीनं पहिल्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कृत्य नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रीसुद्धा पुन्नू आणि मंजूषा दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर अत्यंत टोकात झाले. पुन्नूने आपली पत्नी हिच्या गळ्यावर लाथ मारली. तसेत बेदम मारहाण करुन पत्नीचा खून केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टोंगलापूर येथे घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amravati, Crime news, Murder, Wife

    पुढील बातम्या