नवी दिल्ली, 26 मे : हाणामारीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. भररस्त्यात, दुकानात, मॉलमध्ये, रेल्वे स्थानकावर, बसमध्ये, अशा निरनिराळ्या ठिकाणी भांडणं होत असतात. कधी तर अगदी शुल्लक कारणावरुन वाद होतो आणि त्यांचं रुपांतर भांडणात होतं. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. नुकताच एक महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ समोर आलाय.
अल्पवयीन मुलगी आणि तीन महिलांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांची तुंबड हाणामारी पाहण्यासाठी आजूबाजूचेही जमलेले पहायला मिळतायेत.
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रायपूर येथील भातागावचा असल्याचं सांगण्यात येत आहे. बसस्थानकावर डोसा खाल्ल्यानंतर अल्पवयीन मुलीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दुकान चालवणारी महिला आणि तरुणी यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचे रुपांतर हळूहळू हाणामारीत झाले.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन महिला मिळून एका तरुणीला मारहाण करत आहेत. तिचे केस ओढून तुला बेदम मारहाण करत आहेत. स्थानिक लोक आणि एक पोलीस मध्यस्थी करून मुलीची सुटका करताना दिसत आहेत. महिला आणि तरुणींमधला हा हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे.
Kalesh B/w a Girl and Three Woman on Bus Stand in Raipurpic.twitter.com/iACbanXQTd
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 25, 2023
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 39 सेकंदांचा हा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत.
दरम्यान, असे भांडणाचे, हाणामारीचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही समोर आले आहेत. सोशल मीडियावर असे व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Viral, Viral videos