मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोबाईलवर पाहिला पत्नीचा अश्लील VIDEO, देहविक्रयाचा व्यवसाय करत असल्याची दिली तक्रार

मोबाईलवर पाहिला पत्नीचा अश्लील VIDEO, देहविक्रयाचा व्यवसाय करत असल्याची दिली तक्रार

मोबाईलवर (Husband files police complaint after watching porn video of his wife) आलेल्या एका क्लिपमध्ये आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ पाहून पतीला जबर धक्का बसला.

  • Published by:  desk news

डेहराडून, 21 नोव्हेंबर: मोबाईलवर (Husband files police complaint after watching porn video of his wife) आलेल्या एका क्लिपमध्ये आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ पाहून पतीला जबर धक्का बसला. त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीविरोधात (Police complaint against wife) तक्रार नोंदवली. आपली पत्नी चुकीची कामं करत असून देहविक्रयाच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचं पोलिसांना सांगत या प्रकरणाची पाळंमुळं खणून (Police investigation) काढण्याची विनंती केली.

काय आहे प्रकरण?

उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचं काही दिवसांपासून एकमेकांशी पटत नव्हतं. मध्यंतरी त्यांचं कडाक्याचं भांडणही झालं होतं. या भांडणानंतर त्याची पत्नी घर सोडून निघून गेली होती. गेल्या काही दिवसांपासून घर सोडून गेलेल्या पत्नीशी तक्रारदाराचा काहीही संबंध नव्हता. मात्र एक दिवस त्याच्या मोबाईलवर असा व्हिडिओ आला, जो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

पत्नीचा अश्लील व्हिडिओ

मोबाईलवर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पत्नी देहविक्रयाचा व्यवसाय करत असल्याचा संशय तक्रारदार पतीला आला. ती अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत त्या व्हिडिओत दिसत होती आणि हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असल्याचंही त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजवरून स्पष्ट होत होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. व्हिडिओ पाहून धक्का बसलेल्या पतीनं थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गाठ घेत त्यांना या व्हिडिओची सत्यता तपासण्याची मागणी केली.

हे वाचा- गूढ! पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप

बदनामीची भिती

पत्नीच्या या उद्योगांमुळे आपली आणि आपल्या कुटुंबीयांची बदनामी होत असल्याचा आरोपही तक्रारदार पतीने केला आहे. त्याचप्रमाणे पत्नीकडून वारंवार धमक्या येत असल्याचाही त्याचा दावा आहे. खोट्या केसमध्ये आपल्याला फसवण्याची धमकी देण्यात येत असून पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती तक्रारदार पतीनं केली आहे. पत्नीला महिला सुधारगृहात पाठवून तिला संरक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Police, Porn video, Wife and husband