आग्रा, 28 मे : आग्र्याच्या (Agra News) ब्रह्मपुरी भागात शुक्रवारी दुपारी भररस्त्यात विवाहिता पूजा (28) आणि तिचा प्रियकर शिवम (21) या दोघांची काठीने मारहाण करीत हत्या (Crime News) करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू असल्याने विवाहितेचे पती, सासरे आणि दीराने हत्या केली. आरोपींनी घराच्या बाहेर अत्यंत बिभत्सपणे दोघांची हत्या केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर दोघांचे मृतदेह घराजवळी गल्लीत सोडून सासरा आणि दीराने पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली. विवाहितेच्या सासऱ्यांना गौरव, अभिषेक आणि कृष्णा अशी तीन मुले आहेत. तेदेखील पैंजन तयार करण्याचं काम करतात. गौरवचं लग्न सात वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. त्यांना पाच वर्षांचा राघव नावाचा मुलगाही आहे. सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम नावाच्या एका तरुणाचं त्यांच्या घरी येणं-जाणं होतं. काही महिन्यांपूर्वी त्याचे पूजासोबत प्रेम संबंध सुरू झाले. शुक्रवारी दुपारी पूजाचे सासरे, पती आणि दीराने शिवमला घरी बोलावलं आणि त्याला मारहाण केली. यानंतर त्याला शस्त्राने वार केले. यानंतर पूजालाही मारहाण करुन तिची हत्या केली. दोघांचेही मृतदेह गल्लीजवळ फेकून दिले आणि सासरे-दीर पोलीस ठाण्यात गेले. याबाबत कळताच पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी सासरा आणि दीरासह पतीलाही ताब्यात घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.