मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड

ठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO केला रेकॉर्ड

या व्हिडीओमध्ये महिलेने रडत रडत तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये महिलेने रडत रडत तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये महिलेने रडत रडत तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला आहे.

ठाणे, 27 ऑगस्ट : ठाण्यातील (Thane Crime News) वर्तक नगर भागात राहणाऱ्या एका पीडित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या (Thane Suicide Case) करण्यापूर्वी  तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ (Video) रेकॉर्ड करून आपल्याला मैत्रिणींना पाठवला. या व्हिडिओ संदेशात पीडित महिलेने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं आहे. महिलाचा पती तिच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. (Thane woman commits suicide )

याशिवाय आजारी असताना देखील डॉक्टरकडे न नेता मेलीस तरी चालेल, असं म्हटल्याच महिलेने सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसात अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यात लॉकडाऊनमध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचंही समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये महिला रडत रडत आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन करीत आहे.

हे ही वाचा-धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पगार होत नसल्याने केला शेवट

काय म्हटलय या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन केलं आहे. ती म्हणते की, सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदाम देत नाहीत. त्यामुळे आपण एक एक पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचा वापर करण्यास आपल्याला मज्जाव केल्याचे पीडितेने रडत रडत सांगितले आहे. हिला कमावण्याची काय गरज आहे. तुला घरात कपडे, खायला मिळत नाही का? तर तुला हे काम करण्याची काय गरज, असं म्हणत शिलाई मशीनवर काम करण्यासही बंदी घातली. मात्र पैसे मागितले तर देत नाही. गेल्या 11 वर्षांपासून मी या व्यक्तीसोबत राहत आहे. मात्र माझा नवरा केवळ स्वत:चा विचार करतो. यापलीकडे त्याला काहीच दिसत नाही. लोकांसमोर माझ्याशी खूप चांगलं वागतो बोलतो, खूप महान असल्याचा आव आणतो. मात्र प्रत्यक्षात मला खूप दुय्यम महत्व देत असल्याचं महिलेने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. तिने आपण उचलत असलेलं टोकाचं पाऊल याबद्दल स्वतःच्या आईवडिलांची माफी या संदेशात मागितली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू केला आहे.

आतापर्यंत अनेक महिलांनी सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली होती. परंतु पुराव्याशिवाय सर्व अपराधी निर्दोष सुटत होते. आपल्या बाबतीत असे होऊ नये आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्या सासरच्यांना कठोर शासन व्हावे म्हणून पीडित महिलेने हा व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून आपल्या मैत्रिणीला पाठवला आहे. तिने उचललेल्या पावलामुळे आरोपींना शिक्षा देण्यास नक्कीच मदत होईल.

First published:

Tags: Crime, Suicide, Thane