सिंगापूर 10 डिसेंबर : प्रेमात विश्वासतघात झाला किंवा ब्रेकअप झाल्यानंतर एक्स पार्टनरने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं, की चिडणाऱ्या आणि निराश होणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या सभोवताली दिसतात. अनेक जण रागाच्या भरात आपल्या एक्स पार्टनरला त्रास देण्याचा प्रयत्न किंवा त्याचं वाईट होण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करतात. प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी जमल्यामुळे वाईट कृत्य केल्याच्या अनेक घटना घडत असतात. असंच काहीसं, पण थोडं विचित्र एक प्रकरण सिंगापूरमधून समोर आलं आहे. पत्नीला पराठा बनवून मागणं जीवावर बेतलं; आधी भांडण झालं अन् मग…, पतीचा भयानक शेवट या संदर्भातलं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. या प्रकरणात एका तरुणाने आपल्या पूर्व प्रेयसीला त्रास दिला नाही, तर तिच्या होणाऱ्या पतीच्या घराबाहेर त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने आग लावली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर स्थानिक न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपी तरुण भारतीय वंशाचा आहे. मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रेयसीच्या लग्नाची बातमी ऐकून प्रियकराला जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्याने हे कृत्य केलं. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्ट्रेट्स टाइम्सने शुक्रवारी (9 डिसेंबर) दिलेल्या बातमीनुसार, सुरेंथिरन सुगुमारनला ऑक्टोबर 2022मध्ये दोषी ठरवण्यात आलं. मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती असूनही त्याने आग लावली, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, आपल्या पूर्वीच्या प्रेयसीच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर सुगुमारन संतापला होता. रागाच्या भरात त्याने त्याच्या प्रेयसीचा होणारा पती राहत असलेल्या अपार्टमेंटच्या बाहेर आग लावली होती. 9 लाखांची चोरी, दीड लाख फक्त खाण्यावर उडवले, बॉयफ्रेंडसाठी तरुणीने पाहा काय केलं? सुगुमारनला 11 मार्च रोजी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कळलं, की त्याची एक्स गर्लफ्रेंड दुसऱ्या दिवशी मोहम्मद अजली मोहम्मद सालेह नावाच्या तरुणाशी लग्न करणार आहे. सुगुमरानने अजलीच्या फ्लॅटच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावलं आणि त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोर आग लावली. जिल्हा न्यायाधीश यूजीन टो यांनी शुक्रवारी सुगुमरनला शिक्षा सुनावली. असे गुन्हे फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहेत, असंही त्यांनी सुगुमारनला शिक्षा सुनावताना नमूद केलं. दरम्यान, एक्स गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्याशी होतंय, म्हणून संतापलेल्या सुगुमारनने केलेल्या या कृत्याची सोशल मीडियावरही चर्चा होताना दिसतेय. अनेकांच्या मते, त्याने आपल्या एक्सचा राग तिच्या होणाऱ्या पतीवर काढणं पूर्णपणे चुकीचं आहे. सध्या तरी सुगुमारनने केलेल्या गुन्हेगारी कृत्यासाठी त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.