नवी दिल्ली, 18 जून : दिल्लीजवळी नोएडामधील एका हॉटेलमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे एका तरुणाने कथितरित्या नायट्रोजन गॅसचा मास्क तोंडावर लावून आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांना तरुणाकडे एक सुसाइड नोटही सापडली आहे. या सुसाइट नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येची ही पद्धत तरुणाने इंटरनेटवर पाहिल्याचा खुलासाही त्याने सुसाइड नोटमध्ये केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्ज आणि बेरोजगारीमुळे त्रस्त राकेश दास या 32 वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्र उशिरा हॉटेलच्या खोलीत कथितपित्य नायट्रोजन गॅसचा मास्क तोंडावर लावून आत्महत्या केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) रजनीश वर्मा यांनी सांगितलं की, फेस-3 येथील चोटपुर कॉलनीत राहणाऱ्या राकेश दास (32) या तरुणाने सेक्टर 12 स्थित एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एक खोली बुक केली होती. त्याच रात्री उशिरा पोलिसांना त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली. एसीपीनी सांगितलं की, घटनास्थळी पोलिसांनी पाहिलं की, राकेश दार याने एका गॅस सिलेंडरच्या माध्यमातून तोंडावर मास्क लावला होता आणि त्याची गॅस तोंडात जात होती. नायट्रोजन गॅस शरीरात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळावरुन एक सुसाइड नोटही सापडली आहे. हे ही वाचा- मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या यामध्ये लिहिलं आहे की, तो आधी एका खासगी कंपनीत काम करीत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली. ज्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. तो नुकताच बाबा झाला होता. पत्नीच्या प्रसूतीदरम्यान खूप खर्च झाला होता. त्याच्यावर पाच लाख रुपयांहून अधिक कर्ज आहे. त्याने एका कंपनीत गुरुवारपासून नोकरी सुरू केली होती. मात्र ती नोकरी त्याच्या कामाचं स्वरुप व स्तरावरील नव्हती. यामुळे तो खूप निराश झाला होता. शेवटी एके ठिकाणी डिलिव्हरी दिल्यानंतर तो कामावर गेला नाही आणि सेक्टर-12 मधील एका हॉटेलमधील खोली बुक केली. एसीपीनी सांगितलं की, सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की, त्याने आत्महत्येची ही पद्धत इंटरनेटवर पाहिली होती. त्याने सुसाइड नोटमध्ये आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे. राकेश दास याला 6 वर्षांचा एक मुलगाही आहे. तर दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यांनी सांगितलं की, पोलीस या प्रकरणात गांभीर्याने तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.