मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता महिला-पुरुषांसाठी एकच कंडोम; इथं मिळेल जगातलं पहिलं Unisex condom

आता महिला-पुरुषांसाठी एकच कंडोम; इथं मिळेल जगातलं पहिलं Unisex condom

फोटो सौजन्य - रॉयटर्स

फोटो सौजन्य - रॉयटर्स

जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम (World's First Unisex Condom) तयार झालं आहे.

  • Published by:  Priya Lad

क्वालालाम्पूर, 28 ऑक्टोबर  सुरक्षित सेक्स (Sex) किंवा नको असलेली गर्भधारणा टाळण्याचा एक सोपा पर्याय म्हणजे कंडोमचा (Condom) वापर. महिला आणि पुरुष दोघांसाठीही वेगवेगळे कंडोम उपलब्ध आहेत. पण आता महिला आणि पुरुष यांना वेगवेगळे कंडोम वापरण्याची गरज नाही. कारण दोघांनाही वापरता येईल असा एक कंडोम तयार करण्यात आला आहे. जगातील पहिला युनिसेक्स कंडोम (Unisex Condom)  तयार झाला आहे.

मलेशियातील (Malaysia)  स्त्रीरोगतज्ज्ञांनी (Gynaecologist) Wondaleaf युनिसेक्स कंडोम तयार केला आहे. हा कंडोम महिला आणि पुरुष दोघंही वापरू शकता.

हा कंडोम तयार करण्यासाठी मेडिकल ग्रेड मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. हे मटेरिअल जखमांच्या ड्रेसिंगसाठी वापरलं जातं. पॉलियुरीथेनपासून (Polyurethane) हा कंडोम बनवला आहे. हे मटेरिअल पारदर्शी, पातळ, लवचिक, मजबूत आणि वॉटरप्रुफ असतं.

हे वाचा - जगातला सर्वात महागडा Condom; किंमत वाचूनच येईल चक्कर

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार ट्विन कॅटालिस्ट फर्मचे गायनेकोलॉजिस्ट जॉन टैंग इंग चिन यांनी सांगितलं,हा कंडोम सामान्य कंडोमसारखाच आहे. पण रेग्युल कंडोमपेक्षा जास्त सुरक्षित आहे. हे कंडोम इतकं पातळ आहे, की घातल्यानंतर समजणारही नाही.

Wondaleaf युनिसेक्स कंडोमच्या एका पाकिटात दोन कंडोम असतील आणि याची किंमत 14.99 रिंगिट म्हणजे जवळपास 270 रुपये असेल. डिसेंबरमध्ये फर्मच्या वेबसाईटवर हे कंडोम ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

हे वाचा - तुम्हाला Viagra सारखा जोश देतील या 7 गोष्टी; असा करा आहारात समावेश 

सध्या मार्केटमध्ये कंडोमचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. फ्लेवर्डपासून डॉटेडपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वाला सूट करणारे कंडोमचे अनेक प्रकार दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा वापर करण्यापूर्वी त्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फ्लेवर्ड कंडोम

फ्लवेर्ड कंडोम ओरल सेक्ससाठी उत्तम असतात. याचे अनेक फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्ही याचा वापर व्हेजिनल किंवा अनल सेक्स करताना करणार असाल तर तुमच्या जोडीदाराला यीस्ट इन्फेक्शन होऊ नये यासाठी कंडोमचा फ्लेवर शुगर फ्री आहे ना याची खात्री करा.

डॉटेड कंडोम

सेक्स करताना तुम्हाला अधिक मजा हवी असेल तर डॉटेड कंडोम (Dotted Condom) हा सर्वात चांगला पर्याय आहे. टेक्सचर्ड किंवा स्टडेड कंडोम्स केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या जोडीदारालाही सुखद अनुभव देतात.या कंडोम्सवर दाणेदार पदार्थ असतो. सेक्स दरम्यान या पदार्थामुळे तुमचा जोडीदार अधिक उत्तेजित होण्यास मदत होते.

सुपर थिन कंडोम

जर तुम्ही कंडोम वापरत आहात परंतु तुम्हाला सेक्सचा कंडोम फ्री आनंद हवा असेल तर तुम्हाला सुपर थिन कंडोम (Super thin Condom) नक्की आवडेल. हा एक ट्रान्सपरंट किंवा पारदर्शी कंडोम असतो,त्याची निर्मिती शिरलोन मटेरिअल पासून केलेली असते. त्याचा स्पर्श अगदी स्किनसारखा असतो. अवांछित गर्भधारणा किंवा लैंगिक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हा कंडोम खूप प्रभावी ठरतो.

प्लेजर शेप्ड कंडोम

हा कंडोम दोन्ही जोडीदारांची संवेदनशीलता मोठ्या प्रमाणात वाढवते. याची टीप सैल आणि मोठी असते.

ग्लो इन द डार्क कंडोम (Glow in the Dark Condom)

जर तुम्ही किंकी सेक्सचे शौकीन असाल तर हा कंडोम तुमच्यासाठी योग्य आहे. 30 सेकंद प्रकाशात ठेवल्यानंतर हा कंडोम अंधारातही चमकतो. हा नॉन टॉक्सिक असून त्यात तीन थर असतात. आतील आणि बाहेरील थर हे लॅटेक्सने तयार केलेला असतो. मधला थर हा सुरक्षित रंगद्रव्याने बनलेला असतो,यामुळे हा कंडोम चमकतो.

कंडोम खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

कंडोम खरेदी करतेवेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा तुम्ही कंडोम खरेदी कराल,त्यावेळी त्यावरील लेबल जरूर चेक करा. तसंच गर्भधारणा टाळण्यासाठी आणि एसटीडी बचावासाठी त्या कंडोमला एफडीएनं मान्यता दिली आहे का ते तपासा. जर अशी मान्यता असेल तर ते कंडोम खरेदी करा.

First published:

Tags: Lifestyle, Sexual health