नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा विपरीत घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर पती आणि पत्नी संदर्भातील एक घटना समोर आली आहे. पत्नी भाजी घेऊन, या असे म्हणाली आणि पती संतापला. त्याने याच संतापात आपल्या पत्नीला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना गाझियाबादच्या कवी नगरमध्ये घडली आहे. पत्नी भाजी घेऊन या, असे म्हणताच पती संतापला आणि त्याने तिला भररस्त्यात बेदम मारहाण करायला सुरुवात केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौरव मिश्रा असे या पतीचे नाव आहे. गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिवसभर खूप काम केल्यामुळे मी थकली आहे. त्यामुळे तुम्ही भाजी घेऊन या, असा या महिलेने आपल्या पतीला सांगितले होते. हेही वाचा - लग्नाच्या 9 महिन्यांनंतरही शरीरसंबंधास नकार; रागाच्या भरात पतीचं धक्कादायक पाऊल मात्र, पत्नीने त्याला भाजी आणायचे सांगितल्यावर पती संतापला. तसेच त्याने आपल्या पत्नीला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे पत्नी आपला जीव वाचविण्यासाठी ही महिला त्याठिकाणी धावत सुटली. मात्र, त्याने तिला रस्त्यातही मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती काही शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पती आणि आणखी दोन जणांना ताब्यात घेतले. तर मारहाण झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







