धक्कादायक! न्यायालयातच पत्नीवर तलवारीने सपासप वार; आरोपी पतीला जन्मठेप

धक्कादायक! न्यायालयातच पत्नीवर तलवारीने सपासप वार; आरोपी पतीला जन्मठेप

Crime in Sambalpur: एका व्यक्तीने भर न्यायालयात आपल्या पत्नीवर (Man Attack on wife in Court session) आणि तिच्या नातेवाईकांवर तलवारीने हल्ला (Attack on wife with Sword) केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला आहे.

  • Share this:

संबलपूर, 03 मार्च: एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर भर न्यायालयात (Husband Attacked on Wife in Court) तलवारीने (Sword) हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी  झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Wife Death) झाला आहे. या प्रकरणी न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे.

संबलपूरच्या (Sambalpur) जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा संबलपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बिरंची नारायण मोहंती यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशन सत्रात घडली होती. यावेळी पती रमेश कुंभारने भर न्यायालयात आपल्या पत्नीवर तलवारीने वार करून तिला जीवे मारलं होतं. याप्रकरणी आरोपी पतीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रनेश कुंभारने 23 एप्रिल 2018 रोजी कौटुंबिक कोर्टाच्या आवारात समुपदेशनासाठी आलेल्या आपल्या पत्नी संजीता चौधरी, तिची आई आणि इतर कुटुंबीयांवर तलवारीने हल्ला केला होता. यानंतर आसपास असणाऱ्या लोकांनी रमेशला पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं. ज्यामुळे न्यायालय परिसरात मोठी जीवितहानी टळली होती. जखमींना त्वरित संबलपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान संजीताचा मृत्यू झाला.

(वाचा - बलात्कारासाठी 20 वर्षं शिक्षा भोगली; सगळं कुटुंब संपल्यावर आता ठरला निर्दोष)

सरकारी वकील दीप्ती रंजन सेंढ यांनी सांगितलं की, आरोपी पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 323 (हेतुपुरस्सर जखमी करणं) आणि 449 अवैध शस्त्र बाळगणं आदी कलमांतर्गत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. सरकारी वकील पुढे म्हणाले की, आरोपी पतीला आयपीसीच्या कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरण्यात अयशस्वी झाला, तर दोषीच्या शिक्षेत आणखी दोन वर्षांची वाढ होऊ शकते.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 5:19 PM IST

ताज्या बातम्या