मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; रशिया-तुर्कीतील कॉल गर्ल ताब्यात

हायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; रशिया-तुर्कीतील कॉल गर्ल ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंड स्क्वॉडने छापेमारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंड स्क्वॉडने छापेमारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंड स्क्वॉडने छापेमारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • Published by:  Meenal Gangurde

हरियाणा, 8 जुलै : दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या हरियाणामधील महामार्गावर असलेल्या अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर हायप्रोफाइल सेक्स रॅकेट बर्‍याच काळापासून सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसराची याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहून रहिवाशांनी अनेकदा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र यावर पोलिसांकडून पुरावा मागितला जात असल्याने नागरिक हैराण झाले होते.

पुराव्याशिवाय छापेमारी करता येऊ शकत नसल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात होते. यानंतर या भागातील नागरिकांनी थेट हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना तक्रार केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकल ठाण्याच्या पोलिसांना कळू न देता, फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून हॉटेल आणि ढाब्यांवर बुधवारी रात्री छापेमारी करण्यास सांगितलं. छापेमारी दरम्यान स्थानिकांनी केलेली तक्रार योग्य असल्याचं समोर आलं. छापेमारीत देशातील व परदेशी हाय प्रोफाइल कॉलगर्ल्सला अटक करण्यात आली. स्थानिकांनी पोलिसात याबाबत तक्रार केल्यानंतर त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? याबाबत तपास सुरू आहे.

हे ही वाचा-एका फाटलेल्या नोटमुळे एअरफोर्स जवानाच्या कुटुंबाची हत्या करणारा आरोपी गजाआड

बुधवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास मुरथळमधील 5-6 ढाब्यांवर मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या फ्लाइंड स्क्वॉड यांनी छापा टाकला. यादरम्यान 12 देशी आणि विदेशी कॉलगर्ल्ससह 3 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. अटक केलेल्या कॉल गर्लपैकी 9 जणी दिल्लीच्या रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या उर्वरित तीन मुली उझबेकिस्तान, रशिया आणि तुर्कीमधील आहेत. याशिवाय या मोबाइल पथकाने येथे असलेल्या दुसर्‍या ढाब्यावरही छापा टाकला. या ढाब्यात काही जणं जुगार खेळताना आढळून आले. यामध्ये सुमारे अडीच लाख रुपयेही जप्त करण्यात आले.

खोल्यांमध्ये महागडे फर्निचर पाहून छापेमारी करण्यासाठी आलेले जवान देखील चकित झाले. मुरथलच्या ढाब्यांवरील जेवण दिल्लीपर्यंत प्रसिद्ध आहे. अनेकदा राजधानी दिल्ली आणि त्यालगतच्या गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद येथील शेकडो कुटुंबे रात्रीच्या जेवणासाठी या ढाब्यांमध्ये येतात. दरम्यान येथे सापडलेल्या परदेशी कॉलगर्ल्सची माहिती त्यांच्या दूतावासांना देण्यात आली आहे. पर्यटक व्हिसावर काही विदेशी मुली दिल्लीला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

First published:

Tags: Crime news, Delhi