मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जेलच्या गेटमधून गजा मारणेची मिरवणूक निघालीच कशी? कारागृह प्रमुखांनी दिले चौकशीचे आदेश

जेलच्या गेटमधून गजा मारणेची मिरवणूक निघालीच कशी? कारागृह प्रमुखांनी दिले चौकशीचे आदेश

 कोरोना साथीची भीती असतानाही केवळ दहशत पसरवण्यासाठी गुंड गजा मारणेनं तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढली होती.

कोरोना साथीची भीती असतानाही केवळ दहशत पसरवण्यासाठी गुंड गजा मारणेनं तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढली होती.

कोरोना साथीची भीती असतानाही केवळ दहशत पसरवण्यासाठी गुंड गजा मारणेनं तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढली होती.

पुणे, 17 फेब्रुवारी: पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड गजानन मारणे (gajanan marne)याची तळोजा कारागृहाच्या आवारात मिरवणूक निघालीच कशी? याचीही चौकशी होणार आहे. राज्याचे कारागृह महानिरिक्षक सुनील रामानंद यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. न्यूज 18 लोकमतने (News18 Lokmat) हा मुद्दा उचलून धरल्यानंतर जेल प्रशासन खडबडून जागं झालंय. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अगदी सिनेमा स्टाईलने गजा मारणे तळोजा कारागृहाच्या गेटमधून गाडीत उभा राहून हात उंचावून मोठ्या थाटात बाहेर पडला. यावेळी जेलसमोरूनच त्यांच्या गुंडांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत तब्बल पाचशे वाहनं सामिल झाली होती. विशेष म्हणजे, कोरोना साथीची भीती असतानाही केवळ दहशत पसरवण्यासाठी गुंड गजा मारणेनं तळोजा जेल ते पुण्यापर्यंत ही मिरवणूक काढली होती. माध्यमांनी या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणावर टीकेची झोड उठवताच पोलिसांनी गजा मारणेवर गुन्हा दाखल करत अटकही केली. त्यापाठोपाठ आता जेल प्रशासनही जागं झालं असून तळोजा जेल परिसरातील गुंडाच्या शक्तीप्रदर्शनाची चौकशी केली जाणार आहे. गुंडांच्या गाड्या तळोजा जेलच्या आवारात सोडण्यात आल्याच कशा? तिथं शक्तीप्रदर्शन करूच कसं दिलं गेलं?  याचीही सखोल चौकशी होणार आहे. भायखळा कारागृह विभागाचे विशेष महानिरिक्षक यांच्यामार्फत ही चौकशी केली जाईल, त्यानंतर तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांनी न्यूज18 लोकमतला दिली. दरम्यान, गजा मारणेसह 9 जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातही त्याच्या साथीदारांवर दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच धर्तीवर तळोजा कारागृह ते पुणे हद्दीर्यंत गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केलं आणि दहशत पसरवली. त्या सर्व पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हे दाखल झाले तर गजा मारणे टोळीवर पुन्हा एमपीडीए कायद्यांतर्गंत प्रतिबंधांत्मक कारवाई होऊ शकते.
First published:

Tags: Crime, Gajanan marane, Maharashtra, Mumbai, Parade, Pune, Sunil ramanad orders

पुढील बातम्या