हनुमानगढ, 25 सप्टेंबर : देशात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हत्या, बलात्कार यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच आता राजस्थानमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हनुमानगड जिल्ह्यातील एका खेड्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केल्याची घटना घडली. चुरू रेल्वे स्थानकासमोरील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - महिला पोलिस ठाण्याचे सीआय सुखराम चोटिया यांनी सांगितले की, हनुमानगढ जिल्ह्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गुन्हा दाखल केला आहे. ती 22 सप्टेंबरला तिच्या काकासोबत बसने सालासरला जात होती. मात्र, वाटेत तिचे पर्स चोरीला गेल्याने ते चुरू येथे उतरले. यानंतर त्यांनी चुरूमध्ये रेल्वे स्टेशनसमोर श्रीनाथ हॉटेलमध्ये खोली घेतली आणि तिथे ते थांबले होते. मात्र, रात्री 2.30 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ती गोळी घेण्यासाठी हॉटेलच्या काउंटरवर गेली. हेही वाचा - ‘हे बाळ माझंच’! रुग्णालयात एकाच बाळासाठी 2 महिलांचा दावा; अखेर 56 दिवसांनंतर झाला उलगडा याठिकाणी काउंटरवर एक तरुण होता. या तरुणाकडून या अल्पवयीने मुलीने गोळी मागितली. यावर त्याने तिला समोरच्या खोलीत जाण्यास सांगितले. यानंतर अल्पवयीन मुलगी त्या खोलीत गेल्यावर तो तरुणही खोलीत आला आणि त्याने येताच खोलीच्या दरवाजा आतून बंद केला. तसेच यावेळी आरोपीने अल्पवयीन मुली पकडून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला.
तसेच या घटनेनंतर तिने जर याबाबत कोणाला सांगितले तर तो तिला आणि तिच्या काकांना खोलीतच मारून टाकेल, अशी धमकीही आरोपीने तिला दिली होती, असा आरोप या या अल्पवयीन पीडित मुलीने केला आहे. तर त्यानंतर अल्पवयीन मुलीने संपूर्ण घटना काकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी महिला पोलीस ठाण्यात धाव घेत घटलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.