मराठी बातम्या /बातम्या /Viral /जोरदार गाजतेय वाघ आणि कुत्र्याची लढाई, जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

जोरदार गाजतेय वाघ आणि कुत्र्याची लढाई, जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

एक कुत्रा वाघांच्या टोळीसोबत पंगा (Truth behind viral video of dog and tiger) घेत त्यांना आव्हान देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

एक कुत्रा वाघांच्या टोळीसोबत पंगा (Truth behind viral video of dog and tiger) घेत त्यांना आव्हान देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

एक कुत्रा वाघांच्या टोळीसोबत पंगा (Truth behind viral video of dog and tiger) घेत त्यांना आव्हान देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

एक कुत्रा वाघांच्या टोळीसोबत पंगा (Truth behind viral video of dog and tiger) घेत त्यांना आव्हान देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पाण्यात डुंबत असलेल्या (Dog leaps towards group of tigers) काही वाघांच्या दिशेनं हा कुत्रा झेपावत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. एका कुत्र्याचं हे डेअरिंग पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं. एका कुत्रा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाघांवर कसा (Truth behind the video) काय झेपावू शकतो, असा प्रश्न अऩेकांना पडतो.

वाघ विरुद्ध कुत्रे

वाघ किंवा सिंह यासारख्या प्राण्यांशी झुंज देणाऱ्या आणि त्यात यशस्वी होणाऱ्या प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. मात्र जेव्हा त्यांच्यावर किंवा त्यांच्या पिल्लांवर संकट येतं, तेव्हाच हे प्राणी वाघसिंहांच्या वाट्याला जातात. वाघाने कुठलाही त्रास दिला नसताना उगाच जाऊन त्यांच्याशी पंगा घेण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये आढळत नाही. या व्हिडिओत मात्र वाघांनी काहीही केलं नसताना एक कुत्रा त्यांच्या दिशेनं झेपावत असल्याचं दिसतं आणि पाहणाऱ्यांचा संशय बळावतो. उगीचच कशाला एखादा कुत्रा वाघावर झेपावेल, या प्रश्नाचं उत्तर शोधताना या व्हिडिओमागील सत्य लक्षात यायला सुरुवात होते.

बरं, या व्हिडिओत अनेक वाघ एकत्र पाण्यात डुंबताना दिसत आहेत. तरीही हा कुत्रा त्यांच्या दिशेनं झेपावताना दिसतो. प्रत्यक्ष ही व्हिडिओ एडिटिंगची कमाल असून त्यामुळेच कुत्रा वाघाच्या दिशेनं झेपावल्याचा भास होत असल्याचं स्पष्ट होतं. कुत्रा हा वेगळ्याच ठिकाणी आहे आणि वाघही वेगळ्या ठिकाणी आहेत. कुत्रा हा जमिनीवर आहे. मात्र ही जमीन म्हणजे जलाशयाचा किनारा असल्याचा आभास व्हिडिओ एडिटिंगमधून तयार करण्यात आला आहे.

कुत्र्याने उडी मारल्यानंतर वाघदेखील हवेत झेपावण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. वाघांच्या हालचाली आणि कुत्र्याची झेप या गोष्टींचा एकत्रित परिणाम इतका सुरेख जमून आला आहे की त्यामुळे हा व्हिडिओ खराच आहे, असा भास होतो. प्रत्यक्षात मात्र ही घटना खरी नसून दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र गुंफून तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओला सध्या नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: PHOTOS VIRAL, Viral video.