जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / ऐतिहासिक निर्णय; पुण्यातील आरोपीला तब्बल 250 वर्षांची शिक्षा, असा काय केलाय गुन्हा?

ऐतिहासिक निर्णय; पुण्यातील आरोपीला तब्बल 250 वर्षांची शिक्षा, असा काय केलाय गुन्हा?

न्यायालयाने आरोपीला सुनावली 250 वर्षांची शिक्षा

न्यायालयाने आरोपीला सुनावली 250 वर्षांची शिक्षा

जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरोपीला तब्बल 250 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • -MIN READ Bhopal,Bhopal,Madhya Pradesh
  • Last Updated :

सिहोर, 25 मार्च : मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साई प्रसाद कंपनीच्या संचालकाला तब्बल 250 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढंच नाही तर या कंपनीच्या सिहोर शाखेत काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोटावण्यात आली आहे. बाळासाहेब भापकर असं 250 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. भापकर सोबतच कंपनीच्या सिहोर शाखेमध्ये काम करणारे कर्मचारी दीप सिंह वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांना देखील प्रत्येकी पाच वर्षांच्या सश्रम कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय कुमार शाही यांनी ही शिक्षा सुनावली. पाच वर्षांत डबल पैसे आरोपी बाळासाहेब भापकर याने साईप्रसाद नावाने एका चिटफंड कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पैसे डबल करण्याचं आमिष ग्राहकांना दाखवण्यात आलं. आमिषाला बळी पडून अनेकांनी या चिटफंड कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक केली. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचे कर्मचारी कंपनीला ताळे ठोकून फरार झाले. जेव्हा कंपनीचे ग्राहक आपले पैसे घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा समोरच दृष्य बघून त्यांना धक्काच बसला. या प्रकरणात सिहोर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये एफआरआय दाखल करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला 250 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर भंडाऱ्यात कुऱ्हाडीने हल्ला, वाहन पेटवण्याचा प्रयत्न पुण्याचा रहिवासी या चिटफंड कंपनीचा संचालक बाळासाहेब भापकर हा पुण्याचा रहिवासी आहे. तो दीप सिंह वर्मा, राजेश उर्फ चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत मिळून ही कंपनी चालवत होता. या प्रकरणात बाळासाहेब भापकर याला 250 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात