जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठी बातमी, हिरेन मनसुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

मोठी बातमी, हिरेन मनसुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

मोठी बातमी, हिरेन मनसुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात हिरेन मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 06 मार्च: मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात हिरेन मनसुख (Hiren Mansukh) यांच्या संशयास्पद मृत्यू झाला. अखेर त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये नाका तोंडात पाणी गेले असून शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे सांगितले आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी मुंब्राच्या खाडीत आढळून आला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर व्हिडीओ कॅमेऱ्यात पोस्टमार्टम करण्यात आले होते. तब्बल 3 तास पोस्टमार्टम चालले होते. यात  4 डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम केले होते. विसेरा आणि फॉरेन्सिकसाठी नमुने पाठवेल आहे. हिरेन मनसुख यांच्या घरच्यांनी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रत दिली आहे. यातमृत्येचे कारण स्पष्ट नाही. छातीत काही अंशी पाणी आढळलं आहे. नाकातून रक्त आलं होतं  आणि शरीराच्या बाहेरील बाजूस कोणत्याही जखमा नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी नकार दिला होता. जोपर्यंत  पोस्टमार्टम अहवाल जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मनसुख यांच्या कुटुंबीयांनी मांडली होती. अखेर पोलिसांनी पोस्टमार्टमची प्रत हिरेन यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. हिरेन यांचा खूनच! भावाचा दावा हिरेन हे उत्तम पोहणारे होते व त्यांना कोणतेही टेन्शन नसल्याने त्यांनी आत्महत्या केली नसून हा खूनच असल्याचा दावा त्यांच्या पत्नी व मित्रानी केल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटकांनी भरलेली हिरेन मनसूख यांची स्कोर्पिओ गाडी दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर मिळाल्याने गोंधळ उडाला होता. ती गाडी मनसूख हिरेन यांची असल्याचे सिद्ध होताच त्यांच्या पाठी गुन्हे शाखेचा ससेमीरा लागला होता. शुक्रवारी सकाळी देखील ते कांदिवली गुन्हे शाखेच्या तावडे नामक अधिकाऱ्याला भेटायला जातो, असे सांगून घरातून निघाले ते पुन्हा परतलेच नसल्याचे त्यांच्या पत्नी आणि भावाने सांगितले. ते पोलिसाना संपूर्णतः सहयोग करत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? असा सवाल देखील त्यांच्या पत्नी आणि भावाने उपस्थित केला. त्यांच्या मृतदेहच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल का होते, याचा देखील जाब त्यांनी विचारला. हिरेन मनसूख हे अत्यंत साधे सरळ व्यापारी होते व अव्वल जलतरणपटू असल्याने त्याने खाडीत उडी मारून जीव देणं शक्यच नसल्याचा दावा हिरेन मनसुख यांचे मोठे बंघू विनोद मनसुंक यांनी केला. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी सर्वांनीच केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात