मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हायप्रोफाईल व्यापाऱ्याने केली आत्महत्या, पत्नीने कापून घेतला स्वतःचा गळा; गूढ कायम

हायप्रोफाईल व्यापाऱ्याने केली आत्महत्या, पत्नीने कापून घेतला स्वतःचा गळा; गूढ कायम

एका हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात (High Profile businessman commits suicide) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

एका हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात (High Profile businessman commits suicide) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

एका हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात (High Profile businessman commits suicide) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

मेरठ, 5 ऑक्टोबर : एका हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात (High Profile businessman commits suicide) गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समजताच त्याच्या पत्नीने धारदार शस्त्राने स्वतःचा (Wife tried to commit suicide) गळा कापून घेतला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून (Wife is serious) ती मृत्यूशी झुंज देत असल्याचं चित्र आहे. अचानक घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

अशी घडली घटना

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणारे इंटेरियर डेकोरेटर अमित बन्सल हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आले. त्यांच्या घराशेजारीच कार्यालय असून तिथं ते प्लायवूडचा व्यवसायदेखील करायचे. बन्सल हे हाय प्रोफाईल कुटुंबातील असून त्यांचे जावई हे पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी आहेत. नेहमीप्रमाणे कार्यालयात आलेल्या अमित बन्सन यांनी तिथे स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयात खळबळ उडाली.

पत्नीचाही आत्महत्येचा प्रयत्न

अमित यांच्यापाठोपाठ काही वेळाने त्यांची पत्नी पिंकी कार्यालयात आली. पतीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पेपर कटरनं स्वतःची मान कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकी यांना कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

हे वाचा - भयावह ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट; या गोष्टी ठरतील कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा

पोलीस तपास सुरू

ही घटना समजताच अनेक पोलीस ठाण्यांतील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अमित यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत ते पोहोचलेले नाहीत. अमित आणि त्यांच्या पत्नीचं भांडण झालं होतं. त्यानंतर अमित यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप त्याबाबत कुठलेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पिंकी सध्या बोलण्याच्या अवस्थेत  नसल्यामुळे पोलिसांना कुठलीच ठोस माहिती मिळालेली नाही.

First published:

Tags: Husband suicide, Suicide, Uttar pardesh, Wife and husband