मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद; तरुणाने सहकाऱ्यासोबत केलं हादरवणारं कृत्य

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद; तरुणाने सहकाऱ्यासोबत केलं हादरवणारं कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की एका कर्मचाऱ्याने दुसऱ्यावर थेट गोळीच झाडली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Haryana, India

चंदीगढ 30 मार्च : एक हादरवून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे. यात ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की एका कर्मचाऱ्याने दुसऱ्यावर थेट गोळीच झाडली. ही घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. पीडित व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं, की दोन्ही युवक एका फायनेंशियल फर्ममध्ये काम करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफिसमध्ये खुर्चीवरून झालेल्या वादानंतर रमादा हॉटेलजवळ एका कर्मचाऱ्यावर त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तो हरियाणातील हिसार जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशाल (२३) असे पीडित तरुणाचे नाव आहे, तो फिरोज गांधी कॉलनी, सेक्टर ९, गुरुग्राम येथे राहणारा आहे.

एकाच ताटात जेवणारे दोन मित्र, फक्त मोबाईलमधून फोटो डिलीट नाही केला, घडलं भयंकर कांड

या घटनेची माहिती विशालच्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणाच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 25-54-59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विशालने सांगितलं की, मंगळवारी त्याचा सहकारी अमन जांगरा याच्याशी ऑफिसमधील खुर्चीवरून वाद झाला. पोलिसांनी सांगितलं की, बुधवारी पुन्हा याच मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर ते ऑफिसमधून निघून गेले. पोलिसांनी सांगितलं की, विशालचा आरोप आहे की तो रस्त्यावरून जात असताना अमन मागून आला, त्याने पिस्तूल काढून त्याच्यावर गोळीबार केला.

गुन्हा केल्यानंतर अमनने घटनास्थळावरून पळ काढला. तर डीसीपी पूर्व वीरेंद्र विज यांनी सांगितलं की, आरोपीची ओळख पटली असून आम्ही त्याला पकडण्यासाठी छापे टाकत आहोत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.

First published:
top videos

    Tags: Crime, Gun firing