महराजगंज, 29 मार्च : मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ का ठेवला एवढ्या क्षुल्लक कारणावरून एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मित्राला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील पुरंदरपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झामट गावामध्ये 26 मार्च रोजी एका 30 वर्षीय इन्द्रासन नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. खून करून त्याची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास केला असता मारेकरी हा त्याच मित्र निघाला. संदीप असं मारेकऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी संदीपसोबत आणखी एक विजय नावाच्या मित्राला अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पुरंदरपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगया गावातील 30 वर्षीय इंद्रासन आणि संदीप हे दोघे चांगले मित्र होते. दोघांची लहानपणाची मैत्री होती. पण अचानक एका क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ का ठेवला, यावरून वाद पेटला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे संदीपने इंद्रासनला कायमचं संपवण्याचा कट रचला.
(नाशिक बँकेच्या भिंतीला भगदाड पाडलं, दरोडा टाकणारच होते, पण झाला मोठा पोपट!)
संदीपने आपला मित्र विजयची मदत घेतली आणि इंद्रासनला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावलं. दारू पाजल्यानंतर संदीपने पुन्हा एकदा इंद्रासनसोबत मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याची मागणी केली. पण त्यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं. त्यामुळे रागाच्या भरात संदीपने इंद्रासनवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्यानंतर विजय आणि संदीपने त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि शेतात फेकून दिला.
(पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याचा राग सासऱ्यावर; घटनेने जालन्यात खळबळ)
इंद्रासन घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 24 दिवसांनंतर इंद्रासनचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि संदीपला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातील दोघांनी उडवाउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.