जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शरीरावर डायनामाइट लावून सासरी पोहोचला; पत्नीला मिठी मारताच मोठा ब्लास्ट, दोघांच्याही चिंधड्या उडाल्या

शरीरावर डायनामाइट लावून सासरी पोहोचला; पत्नीला मिठी मारताच मोठा ब्लास्ट, दोघांच्याही चिंधड्या उडाल्या

शरीरावर डायनामाइट लावून सासरी पोहोचला; पत्नीला मिठी मारताच मोठा ब्लास्ट, दोघांच्याही चिंधड्या उडाल्या

यांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली होती, त्यांना एक 20 वर्षांचा मुलगादेखील आहे…

  • -MIN READ
  • Last Updated :

गांधीनगर, 26 फेब्रुवारी : गुजरातमधील (Gujrat News) अरवल्ली जिल्ह्यातील मेघरज बीटी छापरा गावात एका पतीने डायनामाइटने (जिलेटिन) ब्लास्ट करून स्वत:सह पत्नीलाही उडवलं. पती डेटोनेटर (जिलेटिन कॅप) लपटून सासरी पोहोचला होता. त्याने पत्नीला मिठी मारली आणि यादरम्यान ब्लास्ट झाला. पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पतीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 20 वर्षांचा मुलगा… मिळालेल्या माहितीनुसार, शारदाबेनचं लग्न मुलोल गावातील लालभाईसोबत 21 वर्षांपूर्वी झालं होतं. त्यांना 20 वर्षांचा मुलगाही आहे. काही दिवसांपूर्वी महिला माहेरी आली होती. गुरुवारी जेव्हा लालाभाई सासरी आले तर त्यांना वाटलं ते शारदाबेनला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. मात्र ते शरीरावर डेटोनेटर लावून पोहोचले होते. ते आपल्या खोलीत गेले आणि पत्नीला मिठी मारली. तेव्हाच मोठा ब्लास्ट झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे ही वाचा- वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या; अंगणातच मृतदेहाचे तुकडे तुकडे केले पती-पत्नीमधील वादाच कारण आलं नाही समोर.. कुटुंबीयांनी सांगितलं की, दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यामध्ये विविध कारणावरुन भांडण होत होतं. मात्र कुटुंबीयांना वादाच कारण माहिती नाही. मुलालाही आई-वडिलांच्या भांडणाचं कारण माहिती नाही. हत्येची भयावह पद्धत पाहून पोलिसांनी अवैध संबंधाची शक्यता व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात