जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाणी पिण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही; मंडपातून अचानक फरार झाला नवरदेव, नेमकं काय घडलं?

पाणी पिण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही; मंडपातून अचानक फरार झाला नवरदेव, नेमकं काय घडलं?

पाणी पिण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही; मंडपातून अचानक फरार झाला नवरदेव, नेमकं काय घडलं?

हुंड्याशी संबंधित एक विचित्र प्रकरण आता उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलं आहे. यात हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने नवरदेवाने लग्नातून पळ काढला (Groom Ran Away from Marriage Hall).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 12 जून : प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या लग्नाचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. लोक यासाठी खूप आधीपासून तयारी करतात. मात्र काही लग्नांमध्ये अतिशय अजब घटना घडतात. हुंडा प्रथेच्या विरोधात अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत, मात्र अजूनही अनेक ठिकाणी हुंडा प्रथा आहे. हुंड्याशी संबंधित एक विचित्र प्रकरण आता उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलं आहे. यात हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने नवरदेवाने लग्नातून पळ काढला (Groom Ran Away from Marriage Hall). VIDEO: लग्नाच्या स्टेजवरच जोडप्याचं भांडण; नवरीने सगळ्यांसमोर नवरदेवाला लगावली चापट मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण कानपूरच्या शरीफापूर गावातील आहे. यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 144 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. तर उत्तर प्रदेशचे मंत्री धरमपाल सिंह हेदेखील याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेव एक ग्लास पाणी घेण्यासाठी जात असल्याचं सांगून मंडपातून बाहेर पडला. यानंतर तो परतलाच नाही आणि लग्नाच्या ठिकाणाहून गायब झाला. तो परत न आल्याने त्याचा बराच वेळ शोध घेण्यात आला, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. नंतर मुलीच्या आईने अधिकाऱ्यांना सांगितलं की, वराने हुंड्यामध्ये दुचाकीची मागणी केली होती. VIDEO: लग्नाच्या दिवशीही नवरदेव स्वतःच्याच नादात मग्न; मंडपात जे केलं ते पाहून खळखळून हसाल एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘नवरीनं माहिती दिली की आर्थिक अडचणींमुळे नवरदेवाची मागणी पूर्ण झाली नाही, याच काऱणामुळे नवरदेवाने मंडपातून पळ काढण्याची योजन आखली आणि तो फरार झाला.’ मुलीच्या आईने सांगितलं की, वराकडून हुंड्यात बुलेट गाडीची मागणी केली जात होती. जिल्हा समाज कल्याण अधिकारी अंजनी कुमार यांनी सांगितलं की मुलाला लग्न करायची इच्छा नसल्याने तो मंडपातून पळून गेला. हे हुंड्याचं प्रकरण असल्यास पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात