Home /News /videsh /

धक्कादायक! नवरा म्हणाला, 'I LOVE YOU'; त्याच्या डोळ्यादेखतच बायकोने सोडला जीव; नेमकं काय घडलं पाहा

धक्कादायक! नवरा म्हणाला, 'I LOVE YOU'; त्याच्या डोळ्यादेखतच बायकोने सोडला जीव; नेमकं काय घडलं पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

नवऱ्याने आय लव्ह यू म्हणताच बायकोसोबत भयंकर दुर्घटना घडली आणि त्याच्यासमोरच तिचा मृत्यू झाला.

    नूर सुल्तान, 03 ऑगस्ट : आय लव्ह यू हे तीन मॅजिकल वर्ड्स ऐकण्यासाठी कित्येक जण आतुर असतात. आपल्या लाइफ पार्टनरने आपल्यासमोर हे तीन शब्द बोलावेत याची प्रत्येक जण प्रतीक्षा करत असतो.  आपल्या नवऱ्याच्या तोंडून हेच तीन मॅजिकल वर्ड्स ऐकल्यानंतर पुढच्याच क्षणी एका बायकोने त्याच्या डोळ्यादेखत जीव सोडला आहे. कझाकिस्तानमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. 33 वर्षांची येवगेनिया लियोन्टिवा फ्री फ्लाय जम्प करायला गेली. तिचा नवराही तिला सपोर्ट करायला, तिचा उत्साह वाढवायला तिथं आला होता. सुरुवातीला ती थोडी घाबरली होती पण त्यानंतर तिचा नवरा तिला आय लव्ह यू म्हणाला. त्यानंतर तिने उडी मारली ती कायमचीच जग सोडून गेली. तब्बल 100 फूट उंचावरून कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिची अवस्था खूप भयानक होती. 100 फूट उंचावरून कोसळल्याने तिची कवटी फुटली. शरीराचा एका भागावर बरेच फ्रॅक्चर्स झाले. नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायको मृत्यूच्या दारात गेली आणि तिला वाचवण्यासाठी नवरा काहीच करू शकला नाही. हे वाचा - हैवान नवऱ्याने बायको-मुलांना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं; 17 वर्षांनी दरवाजा उघडताच... तिचा नवरा अॅलेक्झांड तकाचेंकोने सांगितलं, येवगेनियाआधी तिची एक मैत्रीणी फ्री-फ्लाय करायला गेली होती. तिने ते यशस्वीरित्या केलं.  माझ्या डोळ्यादेखत माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. मी माझ्या बायकोला सपोर्ट करायला गेलो होतो. पण माझ्या डोळ्यादेखत तिची अशी अवस्था झाली. मला मोठा धक्का बसला. हे मॅनेजमेंटचीच चूक होती. कोर्टात साक्षीदारांनी जम्पआधी येवगेनिया घाबरलेली दिसत होती, असं सांगितलं. तरी इन्स्ट्रक्टरने तिला उडी मारण्यासाठी सांगत होता. त्यानंतर अॅलेक्झांडरने येवगेनियाला आय लव्ह यू म्हटलं आणि तिने उडी मारली. हे वाचा - आता तुरुंगातील महिलाही करू शकणार डेटिंग; कैद्यांसाठी खास वेबसाईट, या असणार अटी 10 ऑक्टोबर 2021 साली ही घटना घडली. रिपोर्टनुसार, जम्पमध्ये वापरली जाणारी सपोर्टिंग दोरी झाडाला बांधली नव्हती. ज्यामुळे हवेत लटकण्याऐवजी महिला थेट जमिनीवर कोसळली आणि तिथं एका लोखंडाला आदळली.  या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने फ्लाय जम्प इन्स्ट्रक्टर अॅलेक्झांडर मुज्निनकसला चार वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सुरक्षेची काळजी न घेतल्याचा आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्याला दोषी ठरवण्यात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या