मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलाला वाचवण्यासाठी आजी-आजोबांनी आखलं भयंकर कारस्थान; नातीचा घेतला बळी

मुलाला वाचवण्यासाठी आजी-आजोबांनी आखलं भयंकर कारस्थान; नातीचा घेतला बळी

अवघी 8 वर्षांची तरुणी शाळेला जाण्यासाठी निघाली तर घरी परतलीच नाही.

अवघी 8 वर्षांची तरुणी शाळेला जाण्यासाठी निघाली तर घरी परतलीच नाही.

अवघी 8 वर्षांची तरुणी शाळेला जाण्यासाठी निघाली तर घरी परतलीच नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

अलीगड, 25 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) अलीगडमधील एका गावात 8 वर्षांच्या मुलीच्या हत्या (Murder) प्रकरणात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मुलीच्या हत्या प्रकरणात तिच्या आजी-आजोबाला अटक केलं आहे. या दोघांचा मुलगा आणि लहानगीच्या काकावर छेडछाड आणि दुष्कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य केलं. (Grandparents kill granddaughter)

वादीला फसवण्यासाठी आजी-आजोबांनी मुलीची हत्या केली आणि नात-आजीच्या नात्याला काळीमा फासला. पोलिसांनी आरोपी आजी-आजोबावर कारवाई करीत तुरुंगात रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेसाठी (School) निघालेल्या 8 वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी गावातील शेतात दिसला होता. (Grand parents plot to save his son, Murder of grand daughter)

मुलीच्या आजीला तिची बॅग, चप्पल सापडल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मुलाचा मृतदेह शोधण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोन दिवसांपर्यंत गावातील 100 हून अधिक लोकांची चौकशी केली. यावेळी मुलीचे आजोबा आणि आजीला एका गावकऱ्याने शेतात जाताना पाहिलं होतं.

हे ही वाचा-रात्री 2 वाजता प्रेयसीच्या खोलीत घेतला गळफास; आत्महत्येमागील धक्कादायक कारण

संशय आल्यानंतर पोलिसांनी सुरू केली चौकशी...

पोलिसांनी संशयाच्या आधारावर आजी-आजोबाला ताब्यात घेत चौकशी केली. मात्र दोघांच्या वक्तव्यात फरक दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक कडक केला. शेवटी दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गावातील एका व्यक्तीने मुलीच्या काकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. काकाचा बचाव करण्यासाठी आजी-आजोबाने 8 वर्षांच्या मुलीची हत्या केली. आजी-आजोबांनी मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Daughter, Murder