मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रात्री 2 वाजता प्रेयसीच्या खोलीत घेतला गळफास; तरुणाच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण

रात्री 2 वाजता प्रेयसीच्या खोलीत घेतला गळफास; तरुणाच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण

या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 25 सप्टेंबर : राजस्थानमधील (Rajsthan News) बाहार शहरात पाच दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. मृत तरुणाची प्रेयसीने त्याला आत्महत्या (Boyfriend Suicide) करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. राजकुमारच्या कुटुंबीयांनी हत्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रभारी मांगेलाल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी मोतीलाल कुम्हार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण 20 सप्टेंबर रोजी रात्री साधारण 12 वाजता घरातून निघाला होता. रात्री 2 वाजता सोनिया ऐरवाल व तिच्यासोबत असलेल्या एका तरुणीने घरी येऊन राजकुमार मृत असल्याची माहिती दिली. या प्रकरणात तरुणी व कुटुंबीयावर हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण राजमुकार याचं त्याच्या शेजारील तरुणी सोनिया हिच्या सोबत प्रेमसंबंध होते. सोनिया राजकुमारसोबत लग्न करू इच्छित होती. मात्र 5 महिन्यांपूर्वी राजकुमार याचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं. यावरुन दोघांमध्ये भांडणं सुरू झाली होती. (boy Suicide by hanging in girlfriends room)

हे ही वाचा-Shocking!20 वर्षे घरातच होता Serial Killer, एक एक करीत कुटुंबातील 5 जणांची हत्या

प्रेयसीमुळे त्रस्त होऊन तिच्याच खोलीत केली आत्महत्या

20 सप्टेंबरच्या रात्री राजकुमार त्याची प्रेयसी सोनिया हिच्या घरी गेला. दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरुन वाद झाला. शेवटी राजकुमाकने सोनियावर वैतागून खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनियाने राजकुमारला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचं कारण पुढे करीत तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासानुसार, राजकुमार आणि त्याच्या प्रेयसीमध्ये सतत वाद होत असे. अनेकदा सोनियाने राजकुमारला पोलीस कारवाईची धमकीदेखील दिली होती.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Suicide